सीअमाटेक २०१९ या भव्य व्यावसायिक प्रदर्शनाची ८ फेब्रुवारी पासून सुरुवात

 

कोल्हापूर : कन्सल्टिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सीअमा) या संस्थेच्या वतीने ८,९,१० फेब्रुवारी २०१९ दरम्यान ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे सकाळी १० ते ६ या वेळेत भव्य व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात आंतराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या पद्धतीबद्दल शास्त्र शुद्ध माहिती तसेच वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच अभियांत्रिकी उपकरणे व सामग्री यांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

सीआमाची स्थापना २००४ साली कन्सल्टिंग इलेक्ट्रिक इंजिनिअर्स प्रातिनिधिक स्वरूपाचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने झाली, सिआमा इंडियन कंपनीज अॅक्ट १९५६ सेक्शन २५ च्या अत्यारित नोंदणीकृत आहे.
सीआमा आपल्या पंजीकृत संस्थेद्वारे आपल्या सभासदांसाठी शैक्षणिक दृष्ट्या कार्यशाळा, औद्योगिक सहल,चर्चासत्र व केस स्टडीच्या माध्यमातून सत्रे आयोजित करतात. त्यामुळे सदस्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. सीअमाचे सदस्य इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या विविध उपशाखेत काम करतात. त्यांच्या अनुभवाचे आणि नवीन मिळालेल्या माहितीचे कथन करतात.

इलेक्ट्रिक सुरक्षितता,उर्जेची बचत, सोलर उर्जा या ध्येयांवर सीआमाचे कार्य सुरू आहे.सीअमाचे www.ceeama.org हे संकेतस्थळ डीजीटल माध्यमातून प्रासंगिक माहितीचे विवरण करतात. सीआमा हे वस्तू उत्पादक व सल्लागार यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. आजच्या आधुनिक युगात सिआमा औद्योगीकरणात महत्वाची भूमिका बजावते. इलेक्ट्रिक अभियांत्रिकी उपकरणांचे उत्पादक सिआमाचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि जे इलेक्ट्रिकल अभियंते सदस्य नाहीत ते सौरक्षक प्रवर्गातून नोंदणी करू शकतात.यावेळी बोलताना सीअमाचे अध्यक्ष अनिल भंडारी म्हणाले की, “सीअमाटेक २०१७ च्या यशस्वी वाटचालीनंतर या वर्षी सीअमाटेक २०१९ घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्रदर्शनाची सुरुवात ८ फेब्रुवारी पासून होत आहे. हे प्रदर्शन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी त्यांची उत्पादने व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. पुण्याचे औद्योगिक केद्र असणाऱ्या चिंचवड मधील ऑटो क्लस्टर येथे भरणार आहे.सहभाग घेणाऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रवर्गातील उपलब्ध उत्पादने आणि त्याकरिता वापरलेले तंत्रञानाबद्दल जाणून घेण्यसाठी व अधिक माहितीकरिता ही प्रदर्शनी उदाहरणासहित आपल्याला पाहायला मिळेल. ३ दिवसांकरिता असलेली ही प्रदर्शनी तरुण अभियंत्यासाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.” ते पुढे म्हणाले की, “इलेक्ट्रिक सुरक्षितता, इलेक्ट्रिकल अपघात व उपकरणांची निगा कशी? कुठे? आणि कधी करावी? त्यासंदर्भात मार्गदर्शन या तीन दिवसांमध्ये होणार आहे.आमाटेक २०१९-सीआमाटेक महोत्सव हा सीअमाने आयोजित केला असून तो ऑटो क्लस्टर चिंचवड येथे ८,९,१० फेब्रुवारी २०१९ ला होणार आहे. सीअमाटेक २०१७ च्या यशस्वी प्रयोगानंतर प्रदर्शन इलेक्ट्रीकल अभियंता व तत्सम अभियंत्याकरिता आयोजिला आहे. इथे उत्पादक आपली उत्पादने, तंत्रज्ञान, सल्ला व मार्गदर्शन याचे आदान प्रदान करतील. अभियांत्रिकी उत्पादने अभियांत्रिकीच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली व दर्जात्मक बांधणी वर आधारित असून आयईच्या नियामवली अतंर्गत समाविष्ट असतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!