
बिक सेलो (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड याभारतातील पहिल्या क्रमांकाच्या पेन ब्रॅण्ड व लेखनसाहित्य उत्पादक कंपनीने आपल्या आशियातीलसर्वांत मोठ्या फॅक्टरीच्या उद्घाटनाची घोषणाकेली. गुजरातमधील वापीजवळ ही फॅक्टरी सुरूकरण्यात आली आहे. बिकची ही नवीनअत्याधुनिक फॅक्टरी भारतीय बाजारपेठेच्या वाढीला चालना देण्याचे काम करेल, त्याचप्रमाणेपालक कंपनी सोसायटी बिक निर्यात केंद्राचीभूमिका बजावेल.
वापी येथील नवीन फॅक्टरीमध्ये १५०० लोकआहेत. पर्यावरणावर याचा कमीतकमी परिणामव्हावा या हेतूने फॅक्टरीमध्ये नूतनीकरणीय ऊर्जेचावापर केला जाणार आहे, तसेच शून्य द्रवकचरानिर्मितीचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीनफॅक्टरीची इमारत ही आयजीबीसी गोल्डसर्टिफिकिटची मंजुरी मिळाल्यानंतर ग्रीन बिल्डिंगम्हणून मान्यता पावणार आहे. फॅक्टरीच्या आवारातअध्ययन व विकास केंद्र स्थापन करण्यात आलेआहे. यामध्ये ५०० तासांचे वर्गातील अध्यापन वप्रात्यक्षिक प्रशिक्षण अशा स्वरूपाचे कौशल्यप्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. गुजरात सरकारने या अभ्यासक्रमांना वैध ठरवलेआहे.या फॅक्टरीच्या उद्घाटनाबद्दल बिकचे मुख्यकार्यकारी अधिकारी व संचालक गोंजाल्वबिक म्हणाले, “या नवीन फॅक्टरीमध्ये केलेलीगुंतवणूक हे बिक भारताप्रती मानत असलेल्याबांधिलकीचे प्रात्यक्षिक आहे. सेलो हा ब्रॅण्डभारतातील सर्वाधिक पसंतीचा ब्रॅण्ड व्हावा यासाठीआम्ही वचनबद्ध आहोत आणि कल्पक, मूल्यवर्धित, दर्जेदार उत्पादने बाजारातपरवडण्याजोग्या किमतीत आणण्यावर भर देतराहू. १२ महिन्यांच्या छोट्या कालावधीत फॅक्टरीचेबांधकाम करण्यासाठी पुरवलेल्या मदतीबद्दल मीभारत सरकार व गुजरात सरकारचे आभार मानतो.”या नवीन फॅक्टरीच्या उद्घाटनानंतर बिकच्या आतादमणमध्ये ५, गुजरातमध्ये १ आणिउत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये १ असे ७ फॅक्टरीझाल्या आहेत.
Leave a Reply