प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आयोजित वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात

 

कोल्हापूर: एका पेक्षा एक परफॉरमन्स कलाविष्कारांची उधळण, गीत नृत्यांचा धमाका आणि प्रत्येक कलाकाराची वेगळी कला अशा वातावरणात प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्यावतीन आयोजित वार्षिक स्नेहसम्मेलन रविवारी पार पडल. वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा सतेज पाटील आणि सिने अभिनेत्री हेमंत इंगळे यांच्या हस्ते या स्नेहसम्मेलनाच उद्घाटन झाल. स्पर्धेतील सहभागी कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली. या कार्यक्रमासाठी महिलांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती.कोल्हापुर हे कलानगरी म्हणून ओळखलं जात. त्यामुळ येथील प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काहीना काही कलागुण असतात, महिलां देखील त्यामध्ये पिछाडीवर नाहीत. त्यामुळ अंगभूत कलागुण असलेल्या महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशान, प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्यावतीन ड्रीम वर्ल्ड इथ वार्षिक स्नेहसम्मेलनाच आयोजन करण्यात आल होत. वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा सतेज पाटील आणि सिने अभिनेत्री हेमंत इंगळे यांच्या हस्ते या स्नेहसमेलंनाचे उद्घाटन झाल. कलाविष्कारांची उधळण, एका पेक्षा एक गीत नृत्यांचा धमाका, जोडी तुझी माझी स्पर्धेतील धम्मालपरफॉर्मन्स आणि प्रत्येक महिला कलाकाराची वेगळी कला अशा वातावरणात तब्बल चार तास हा वार्षिक स्नेहसम्मेलनाचा कार्यक्रम रंगला होता. उपस्थित महिलांनी देखील या कार्यक्रमाला तीतकीच दाद देत, उत्स्फूर्त गर्दी केली होती. यावेळी स्पर्धेतील सहभागी कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रत्येक स्पर्धाअविस्मरणीय ठरली. सहभागी कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांच लक्ष वेधल. गीत, नृत्य, समूहनृत्य, अशा कला प्रकाराबरोबरच मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकेमुळे स्पर्धेत कोल्हापुरच एक वेगळ प्रतिबिंब पहायला मिळाल. डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या महिलांच्या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके महिलांना अक्षरशः खेळवून ठेवलं होत. दरम्यान, यावेळी सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा सतेज पाटील यांनी, कोल्हापुरातील महिला कलाकारांच्या अंगी असलेल्या कला गुणाना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वेल्फेअरच्या माध्यमातून हा उप्रकम सुरु करण्यात आल्याच त्यांनी सांगितल. वेल्फेअरच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करण्यात येत असल्याचही  त्या म्हणाल्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी, त्यांच्याकड सर्व गोष्टींच ज्ञान असलं पाहिजे, अस आवाहनही प्रतिमा पाटील यांनी केल. शिवाय आई-वडील सुसंस्कार असतील तरचं मुलांच्यावर देखील चांगले संस्कार होतात. त्यामुळ, एक स्त्री म्हणून, आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करा. शिवाय महिला या समाजाचा कणा आहेत, महिला सक्षम झाल्या की आपोआपच समाज सक्षम होईल. आपण सर्व महिला एकत्र आलो तर एक सक्षम समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर  महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील त्यांनी मार्गदर्शन केल. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन करत सोशल वेल्फेअरच्यावतीन, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्यात येत असल्याचही त्यांनी सांगितल. शिवाय आयुष्यामध्ये काही तरी ध्येय ठेवा आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्न करा, तरच आपण एक चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकतो, असही सौ प्रतिमा पाटील यांनी सांगितल.
   यावेळी सिनेअभिनेत्री हेमल इंगळे यांनी, आपल्या यशाचं आणि सुंदर दिसण्याच रहस्य सांगताना, प्रथम स्वत:वर प्रेम करायला शिका असा कानमंत्र महिलांना दिला. आपल्या यशामध्ये आमदार सतेज पाटील आणि सौ. प्रतिमा पाटील यांच मोठ पाठबळ असल्याचही त्यांनी मनमोकळे पणान नमूद केल. आपल्या आगामी “अशी ही आशिकी” या मराठी चित्रपटाबदल बोलताना हेमल इंगळे यांनी हा चित्रपट १ मार्चला प्रसिद्ध होत असल्याच सांगितल. यावेळीसिनेअभिनेत्री हेमल इंगळे यांनी,  ‘तेरी मेरी आशिकी” या गाण्यावर डान्स सादर करत, धम्माल उडवून दिली

यावेळी आहार तज्ञ डॉ. रेश्मा चरणे यांनी महिलांना आहार आणि आरोग्या विषयी मार्गदर्शन केल. सुत्रसंचालक विकास बामणे यांनी वेगवेगळे किस्से, गीत नृत्यांशी संबंधित गमती-जमती सांगत स्पर्धेत रंगत आणली. या कार्यक्रमावेळी,  स्वाती येवलुजे, माधुरी लाड, छाया पोवार, जयश्री चव्हाण,वृषाली कदम, उमा बनछोडे, शोभा कवाळे, श्री राम संस्थेच्या संचालिका वनिता बेडेकर, ऋग्वेदा माने,  स्नेहल चौगुले, हेमा जाधव,स्मिता खामकर, प्रिया पावसकर, वैभवी जरग, अर्पिता माने, संयुक्ता घाडगे, अनुष्का वणकुंद्रे, दीपाली देसाई, मंजिरी मोरे यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिला, गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!