वेस्टसाईडचे कोल्हापूरमधील पहिले दालन सुरु

 

कोल्हापूर : भारतातील सर्वांच्या पसंतीचे टाटा हाऊसचे फॅशन दालन असणाऱ्या वेस्टसाईडचे पहिले दालन कोल्हापूरमध्ये सुरु झाले आहे. शॉपिंग अनुभवाची पुनर्व्याख्या करणाऱ्या या नव्या दालनामुळे वेस्टसाईडच्या भारतातील दालनांची संख्या आता १४२ इतकी झाली आहे. हे दालन मेरी वेलनेस हॉस्पिटलच्या समोर कवळा नाका येथे सुरु करण्यात आले आहे आणि एकाच छताखाली येथे वस्त्रप्रावरणे, अॅक्सेसरीज, सौंदर्यप्रसाधने आणि पादत्राणे अशा सगळ्या गोष्टी मिळणार आहेत.वेस्टसाईडमध्ये महिलांसाठी समकालीन आणि वैशिष्ट्यपूर्ण खास डिझाईन केलेले कपडे मिळतात. वॉर्डरोब हे ९ ते ९साठी लागणारे कपडे, कॅज्युअल आणि आत्मविश्वासपूर्ण एलओव्ही, तरुण आणि फिटिंगचे न्युऑन आणि सॅसी सोडा,थोडी गोलाई असणाऱ्या स्त्रियांसाठी जिया, खास व्यायामासाठी स्टुडीओ फिट, तुमचा वैयक्तिक फॅशन विशेष वाढविण्यासाठी वंडरलव्ह, सणासुदीच्या दिवसांतील पारंपरिक वार्क कलेक्शन बोहेमिया छपाई आणि छायाचित्र यांचे मिश्रण असणारे बॉम्बे पेसली, तलम रेशमी धाग्यांचे झुबा अशा प्रत्येक प्रकारच्या ब्रँडचे कपडे प्रत्येक ट्रेंड जपणाऱ्या स्त्रियांसाठी येथे उपलब्ध आहेत.फॅशन मधील अत्याधुनिक ट्रेन्ड, प्रवाह जपताना वेस्टसाईडने पुरुषांसाठीची विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे सादर केली आहेत. पुरुषांसाठीच्या ब्रँड मध्ये तरुण आणि फिटिंगचे न्युऑन, पारंपरिक प्रकार आणि नैसर्गिक धाग्यांसाठी इटा, परिपूर्ण शिलाईसाठी प्रसिद्ध अस्को, कॅज्युअल वॉरडोब साठी पाहिजेच असा वेस्टसपॉर, खास व्यायामासाठी स्टुडीओ फिट आणि समकालीन आणि आत्मविश्वासपूर्ण वॉरडोब साठी वेस असे विविध प्रकारचे ब्रँड आहेत.मुलांसाठीची खरेदी म्हणजे खरोखरच मुलांचा खेळ असतो. बेबी हॉप, हॉप किंवावायअँडएफ या ब्रँडचे कपडे आकाराने लहान असतील पण एकदम स्टायलिश आहेत.स्टुडीओ वेस्टमध्ये समकालीन भारतीय स्त्रीसाठी विविध रेंज मधील सौंदर्यप्रसाधने, परफ्युम्स आणि शाही पद्धतीची स्नानासाठीची उत्पादने आहेत.

2 responses to “वेस्टसाईडचे कोल्हापूरमधील पहिले दालन सुरु”

Leave a Reply to sablon kaos satuan Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!