
कोल्हापूर:३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, स्वराज्य सामाजिक संस्था आणि यशवंत अकँडमी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी एक विशेष अभियान घेण्यात आले. या अभियानात मोटार वाहन निरिक्षक सुरेश माळी आणि स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सुरेश माळी यांनी उदाहरणासहीत विद्यार्थ्यांना पटवून दिले की शुल्लक कारणांमुळे देखील वाहनांचे मोठे अपघात कसे होत आहेत. वाहन चालवणेच्या परवान्याबाबत त्यांनी माहिती दिली. वाहन चालवताना मोबाईल वापराचे दुष्परिणाम, चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट वापराचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. वाहन चालवताना कोणती सुरक्षितता बाळगावी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सागर घोरपडे म्हणाले की आज खरोखर मुलांमध्ये वाहन चालवणेबाबत जागृती झाली पाहिजे. पूर्वी वाहनांची संख्या कमी होती, त्यामुळे लोकांना रस्त्यावर चालने सोपे होते. पण वाहनांची वाढलेली संख्या आणि अरूंद रस्ते यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाहनांचा वापर कमी करून केएमटी, एसटी सारख्या सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार उदय ओतारी यांनी मानले. यावेळी यशवंत अकँडमीचे विकास काशिद, प्रतिमा काशिद, स्वराज्य सामाजिक संस्थेचे अजय शिंदे, प्रशांत गवळी, समिर मुल्लाणी,नवीन जाधव,उमाकात आवटे सर यांच्यासह क्लासचे सुमारे २५० विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply