
भुदरगड : तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी बोलताना माजी आमदार के. पी. पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं भरभरून कौतुक केलं .खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देशपातळीवर उंचावलं आहे.येणार्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊया, त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं असं आवाहन माजी आमदार के.पी. पाटील यांनी केलं. खासदार महाडिक यांना पुन्हा खासदार करण्याची शपथ त्यांनी घेतली. यावेळी बोलताना संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांनी, भुदरगड तालुका नेहमीच राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला आहे, याही निवडणुकीत याचा प्रत्यय मतदानातून येईल असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी जनता निश्चितच मला पुन्हा एकदा खासदार बनवेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी भुदरगड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, पंडितराव केणे, मधु अप्पा देसाई, विश्वनाथ कुंभार, विलास कांबळे, सुनील कांबळे, निवास अण्णा देसाई, दौलतराव जाधव, संग्रामसिंह देसाई, धोंडीराम वारके, संतोष मेंगाणे, सचिन देसाई यांच्यासह भुदरगड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply