
कोल्हापूर:जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए- मोहम्मद या आतंकवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर आक्रमण केले. यापूर्वी या आतंकवाद्यांनी उरी येथे असाच भ्याड हल्ला केला होता. त्यांना धडा शिकवण्यासाठी सप्टेंबर १६ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून पाकव्याप्त काश्मीर मधील आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानच्या वागणुकीत कोणताच बदल झाला नाही. अजूनही सैनिकांचे बळी जात आहेत. कालच्या भ्याड हल्ल्यात 44 सैनिका जागीच ठार झाले. पाकिस्तानची यामुळे हिम्मत वाढली आहे. अशा प्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या आणि देशाची जगभरात नाचक्की करणाऱ्या पाकिस्तानचे आव्हान भारतीय शासनकर्त्यांनी तात्काळ मोडून काढणे आवश्यक आहे. आणखी किती सैनिक हुतात्मा झाल्यावर भारतीय शासन करते जागे होणार आहेत असा सवाल आज समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आला? पुलवामा येथे झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पाकिस्तानचा झेंडा जाळून आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. भारतीय सैनिकांच्या बळी घेणाऱ्या पाकिस्तानशी भारताने आता कोणत्याही प्रकारची चर्चा न करता थेट सैनिकी कारवाई द्वारे चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे महेश उरसाल, संभाजी साळुंखे, शिवसेनेचे किशोर घाटगे, संजय पवार, राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे शरद माळी, वंदे मातरम युथचे अवधूत भाट्ये,विहित चे अशोक रामचंदनी आणि हिंदू महासभेच्या दिपाली खाडे यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या स्पीड न्युज एक नंबर लाइव्ह ई पेपर आहे एक वाचक