जुळता जुळता जुळतंय की’च्या विशेष भागात असणार शेफ विष्णु मनोहर यांच्या स्पेशल रेसिपीज

 

कोल्हापूर:आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांचीलव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.अपूर्वाचे स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिला आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडेहॉटेल विकणे हा एकमेव मार्ग जरी असला तरी विजय तिला असे करण्यापासून रोकतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष  ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर कोल्हापूरात येऊन ‘बेस्ट शेफ’ची निवड करणारआहेत’ या जाहिरातीकडे जाते. विष्णु मनोहर अपूर्वाच्या हॉटेलमध्ये येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आणि पदार्थांशी निगडीत कोणत्या टिप्स देणार हे प्रेक्षकांना येत्या सोमवारी एक तासाच्या विशेषभागात पाहायला मिळणार आहे.

ख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून पदार्थांची रेसिपी जाणून घ्यायला अनेक स्त्रिया आतूर असतात आणि आता तर घर बसल्या स्त्रियांना आणि प्रेक्षकांना ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतूनविष्णु मनोहर यांच्याकडून रेसिपी जाणून घ्यायला मिळणार आहेत.

“अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते पदार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. असे हवेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल”, असे विष्णु मनोहर यांनी म्हटले.अपूर्वाने बनवलेल्या  स्पेशल डिशेस, विष्णु मनोहर यांची  खास रेसिपी आणि अपूर्वाविजय यांच्या नात्याची लव्हस्टोरी पाहण्यासाठी नक्की बघा ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फक्त सोनी मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!