
कोल्हापूर:उद्या (ता. 17) सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीत सराफ बाजार बंद ठेवून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी सर्व व्यावसायिक भाऊसिंगजी रोड गुजरी कॉर्नर सराफ बाजार येथे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सभासद आणि सुवर्णकार बंधूंनी आपले व्यवहार बंद ठेवून सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे. काश्मीर येथे पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 49 जवानांचा नाहक बळी गेला. या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच, अशा तीव्र शब्दांत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी संताप व्यक्त केला.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात आज या घटनेचा निषेध करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. प्रथम शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि सभासदांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, संचालक जितेंद्र राठोड, किरण गांधी, संजय चोडणकर, रवींद्र राठोड, नितीन ओसवाल, सभासद बन्सीधर चिपडे, नंदकुमार ओसवाल, अशोक ओसवाल, मनोज राठोड, सुहास जाधव, केशव आडसुळे, अजय जैन, व्यंकटेश सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते.
Leave a Reply