
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ या विभागामार्फत संपूर्ण देशात प्रत्तेक जिल्ह्यातील कर्मचारी व कामगार वर्गासाठी कामगार विमा योजना रुग्णालयाची निर्मिती शासनाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये १३ ठिकाणी राज्य शासनाच्या आखत्यारीत रुग्णालये सुरु आहेत तर पुणे आणि कोल्हापूर अशा दोन ठिकाणी केंद्र शासन संचलित रुग्णालये सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सन १९९७ मध्ये सुमारे ९ एकर जागेत १०० बेडचे प्रशस्त असे इसीजी रुग्णालय बांधण्यात आले. परंतु, शासकीय निधी अभावी गेली १८ वर्षे सदर रुग्णालय दयनीय अवस्थेत आहे. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करून रुग्णालयाला उर्जितावस्था देण्याकरिता विधानसभेत विविध आयुदाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून, त्याला यश आल्याची माहिती, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत बुधवारी आरोग्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर, आरोग्य विभागाचे सचिव श्री.व्यास, इएसआयसीचे कमिशनर आप्पासाहेब धुळाज यांची बैठक पार पडली असून, येत्या काही दिवसात इएसआयसीचे रिजनल डायरेक्टर श्री. सिन्हा कोल्हापुरातील रुग्णालयास भेट देणार आहेत.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ या विभागामार्फत सन १९९७ मध्ये कोल्हापूर येथे रुग्णालय उभे करण्यात आले आहे. सध्यस्थिती या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे. सन २०१६ पर्यंत फक्त कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र मर्यादित असणाऱ्या या रुग्णालयाची सेवा माहे ऑगस्ट २०१८ पासून कोल्हापूर जिल्हा मर्यादित करण्यात आली. सध्या या २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून हे रुग्णालय इएसआय कॉर्पोरेशन कडे हस्तांतर करण्यात आले. परंतु, निधी अभावी या रुग्णालयात मुलभूत सोईसुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गोरगरीब कामगारांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत विधानसभेत मांडलेल्या विविध आयुदाद्वारे शासनाचे लक्ष याप्रश्नाकडे वेधले असून, त्यास यश आले आहे.
Leave a Reply