
कोल्हापूर : अवघे विश्व पाहण्याचा आनंदच जन्मापासून गमावलेल्या पण जिद्द न हरलेल्या बाल – युवकाना दीप फौडेशनने बोलणारी घडयाळे भेट देत , त्यांना दिलेला निखळ आनंद व त्यांचा वाढलेला आत्मविश्वास हा लाख मोलाचा आहे ‘ अश्या भावपुर्ण शब्दात बाल कल्याण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकतै , राज्य शासनाच्या बाल कल्याण समिती चे सदस्य विष्णू बाळकृष्ण शेटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . नव्यानेच स्धापन झालेल्या दिप फौडेशनच्या वतीने मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधनी संचालित अंध प्रबोधिनी मध्ये अंध विधार्थी वर्गास वापर ता येणारी बोलकी घडयाळे वाटपाचा भावपुर्ण सोहळा पार पडला ,याचे अध्यक्षस्थान शेटे यांनी भूषविले . प्रारंभी प्रबोधीनीच्या विध्यार्थीनी स्वागत गीत म्हणून संगीत सूरमय सुरुवात केली . संगीत शिक्षक गौतम कांबळे यांनी गुलाब पुष देऊन पाहण्याचे स्वागत केले . दीप च्या अध्यक्षा राजेश्र्वरी बांदेकर यांनी आपले बंधू कै . दीपक च्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी हे फौडेशन कार्यरत रहणार असल्याचे सांगत मरणोत्तर नेत्रज्ञानाचा संकल्प ही जाहीर केला . फौडेशन चे उपाध्यक्ष डॉ . अभिजीत पवार यांनी भविष्यात विविध पैलूनी सामाजातील वंचित घटकाना दीप च्या माधमातून मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला . या उपक्रमाचे समन्वयक – शायरन फिचर्स चे राजेंद्र मकोटे यांनी नेमकी मदत उपलब्धीसाठी कधीही संपर्क साधण्याचे आहवान केले. या वेळी उपस्थित ज्येष्ठ कार्यकतै एम .बी.पडवळे , नेत्र विभागाचे विरेंद्र वणकुद्रे , ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर अनिल वेल्हाळ सह सर्वाचे आभार सदस्या वहिदा मुल्ला यांनी मानले . सर्वाना खाऊ वाटपाने या सोहळयाची सांगता झाली . घड्याळे मिळालेली बालके पुनःपुन्हा वेळ ऐकण्याचा आनंद घेत होती.
Leave a Reply