शेमारूने केली ‘शेमारुमी’ या नव्या ओटीटी मंचाची घोषणा

 

 

मुंबई :शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडने नुकतेचशेमारुमीया आपल्या ओव्हर द टॉप मंचाचे उद्घाटन केले. बॉलिवूड सेन्सेशन टायगर श्रॉफच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात ही सेवा प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. शेमारुमीहे भारतीय बाजारपेठेसाठीचे एक सर्वसमावेशकअॅप आहे. बॉलिवूड, गुजराती, भक्तीपर कार्यक्रम, पंजाबी आणि बालमनोरंजन या विभागांतील भारतीय व्हिडीओ कन्टेन्टच्या शोधात असलेल्या भारतीय प्रेक्षकांना येथे वैविध्यपूर्ण आणि इतरत्र पाहता येणार नाही असे खास चित्रपट व कार्यक्रम उपलब्ध होतील, जिथे प्रत्येक वयोगटासाठी त्यांच्या आवडीने मनोरंजन असेल. आवडीचे कार्यक्रम, चित्रपट पुन्हा-पुन्हा पाहण्याची संधी कधीही न दवडणा-या, त्यातील प्रत्येक डायलॉग तोंडपाठ असणा-या, प्रत्येक सीन काळजावर कोरला जाईपर्यंत श्वास रोखून पाहत राहणा-या चाहत्यांचे हे वेड साजरे करावे या हेतूने शेमारुमी हा मंच तयार करण्यात आला आहे. देशभरात विखुरलेल्या भारतीय प्रेक्षकांसाठी त्यांच्या मातृभाषेतील मनोरंजन म्हणजे मनाचा एक हळवा कोपरा असतो. त्यातल्या अस्सल गावरान ठसक्याची गोडी त्यांनी वर्षानुवर्षे मनाशी जपलेली असल्याने अशा मनोरंजनाशी त्यांचे नाते चटकन जुळते. गुगल-KPMG अहवालानुसार २०२१ पर्यंत भारतातील इंटरनेटच्या पाठिराख्यांमध्ये ७५% प्रमाण हे भारतीय भाषांतून इंटरनेट वापरणा-यांचे असेल. या अहवालात पुढे असेही म्हटले आहे की,२०१७मध्येच भारतात स्मार्टफोन वापरणा-यांची संख्या ३०० मिलियनच्या घरात पोहोचली होती. २०२२ पर्यंत ही संख्या आणखी वाढून ४४०मिलियनपर्यंत पोहोचणार हे निर्विवाद आहे.महानगरांच्या कक्षेबाहेर राहणा-या याच सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हा शेमारुमीचा हेतू आहे. ज्याची आवडनिवड चाकोरीतल्या इंग्रजीभाषिक ग्राहकांसारखी मर्यादित नाही अशा प्रेक्षकवर्गापर्यंत शेमारूला आपली सेवा पोहोचवायची आहे. ज्याच्या त्याच्या आवडीनिवडींनुसार बेतून दिलेले मनोरंजन प्रेक्षकांना देऊ करण्याची योजना आखणारे शेमारुमी प्रत्येक भारतीयाच्या विशिष्ट प्राधान्यक्रमाला साजेसे कार्यक्रम देऊ करेल. या मंचामध्ये बॉलिवूड क्लासिक, बॉलिवूड प्लस, गुजराती, किड्स, भक्ती, इबादत व पंजाबी अशा सात गटांचा समावेश असेल आणि त्यातून आपल्या आवडीच्या गटाची निवड करून फक्त तेवढ्यापुरतेच पैसे स्वतंत्रपणे देण्याचे स्वातंत्र्य इथे प्रेक्षकाला असेल. शेमारू एंटरटेनमेंटचे सीईओ हिरेन गाडा म्हणाले, शेमारूने घेतलेली ही मोठी झेप आहे. कंपनी म्हणून आम्ही नेहमीच भारतीय प्रेक्षकाची नस अचूक पकडली आहे आणि आमचा इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. क्लासिक असो किंवा चालू काळातले पण बॉलिवूडचे चित्रपट हे सदैव आमचे बलस्थान राहिले आहेत, आणि आजवर या आघाडीवर फार काही पाहण्यापासून वंचित राहिलेल्या आमच्याप्रेक्षकांना नव्या जुन्या मनोरंजनाचे समृद्ध व वैविध्यपूर्ण पर्याय देत राहणे आणि निश्चितच त्यांच्‍या मागणीची पूर्तता करणे हा आमचा हेतू आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी टायगर श्रॉफ म्हणाला, शेमारू हा माझ्या बालपणीचा आणि वाढत्या वयातील अविभाज्य घटक होता. मला आठवते, लहान असताना मी माझे आवडते चित्रपट पुन्हा-पुन्हा पाहत बसायचो. आज शेमारूने मला माझे ऑल-टाइम फेव्हरेट बॉलिवूड चित्रपट पाहण्याची संधी नव्याने दिली आहे, याचा मला आनंद आहे. मी एक अस्सल बॉलिवूड प्रेमी आहे आणि शेमारुमी म्हणजे शेमारूने भारतातील असली चाहत्यांना केलेला सलाम आहे. शेमारूने भारतीय ग्राहकांची नस अचूक ओळखली आहे आहे. दर्जेदार ऐवजाच्या न संपणा-या यादीच्या माध्यमातून ही कंपनी प्रत्येक पिढीची मागणी पूर्ण करू शकेल. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी अत्‍यंत आनंदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!