दहशतवादी हल्लाच्या निषेधार्थ साथी फाऊंडेशनच्या वतीने ‘वॉक फॉर नेशन’

 

कोल्हापूर : कोल्हापूर येथील साथी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने काश्मीर ( पुलवामा ) मध्ये शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आदरांजली अर्पण करण्या करिता वॉक फॉर नेशनचे आयोजन केले होते.
निवृत्त आर्मी कर्नल अमरसिंह रामचंद्र सावंत , कॅप्टन राजीव यादव , कारगिल युध्दात सहभाग घेतलेले नायक महेश गुरव , हवालदार भास्कर कुरणे , व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे , सहयाद्री कॅडेट कोरचे, गणेश बाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ७.३० वाजता वॉकची सुरुवात शिवाजी पुतळा येतून भवानी मंडप , बिंखांबी गणेश मंदिर , मिरजकर तिकटी , खासबाग मैदान मार्गे बिंदू चौक येथे समापन करण्यात आले.
कर्नल अमरसिंह व अशोक रोकडे यांनी अमर ज्योतीला पुष्प चक्र अर्पण करून अभिवादन केले .
वॉक मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी व सदस्यांनी बिंदू चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा स्तंभासमोर मेणबत्या प्रज्वलित करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली .
नागरिकांनी खंबीर राहिले पाहिजे , त्यांनी खचून जाता कामा नये , त्यांनी आपसी सलोखा राखला पाहिजे.आपले सन्य दल समर्थ आहे ते लवकरच योग्य ती कार्यवाही करेल.असे कर्नल अमरसिंह आपले मनोगत व्यक्त केले.
व्हाईट आर्मी चे अशोक रोकडे म्हणाले’ पुलवामाचा हल्लाला हा भ्याड हल्ला आहे. स्थानिक लोकांचा यात सहभाग आहे . सरकारने यावर योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी भारताचा ध्वज घेऊन ” वीर जवान अमर रहे ” व्यर्थ न हो बलिदान ” भारतीय सेना करती है बलिदान , हमे देना चाहिए इनको पुरा सन्मान, भारतीय सेना में है वीर जवान जो है भारत देश की शान ” असे फलक घेऊन मुले व महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग होता .
कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष कपिल पवार,उपाध्यक्ष कैलास मेढे ,कोषाध्यक्ष निखिल शिंदे ,ट्रस्टी अर्जुन पाटील ,कैलाश पाटील कपिल देसाई ,मानसिंग पाटील, संतोष सुतार व चंद्रकांत वडगावकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्र गीताने करणेत आला.
सूत्र संचालन गणेश बाटे यांनी तर आभार विनय गुरव व जितेंद्र बामणे मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!