
दर सहामहिन्यांनी नवीन गाडी सादर करून आपली
कोल्हापूर: कियामोटर्स, या जगातील८ व्या क्रमांकाच्या ऑटो मेकर ने कोल्हापुर मधील डिझाइन टूर मध्ये आपल्या दोन जागतिक दर्जाच्या गाड्या सादर केल्या. आता कंपनी आपली बहुप्रतिक्षित मिड एसयूव्ही SP2i २०१९ मध्ये सादर करण्यास सज्ज झाली आहे. या सादरीकरणा सोबतच येत्या तीन वर्षात भारतातील आघाडीच्या ५ ऑटोमेकर्स मध्ये स्थान मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.भारतात पहिली गाडी सादर केल्यानंतर दर सहा महिन्यांनी नवी गाडी सादरकरण्याचे उद्दिष्ट ठेवून किया २०२१ पर्यंत आपल्या उत्पादन यादीत किमान ५ गाड्या आणणार आहे.२९ जानेवारी २०१९ रोजी किया मोटर्स इंडियाने आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि शिन बोंगकिल, रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत यांच्या उपस्थितीत चाचणी कार्यान्वयनाला सुरूवात केली. या समारोहाला किया मोटर्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हान-वू पार्क आणि किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कूख्यून शिम उपस्थित होते. या समारंभात कियाने आपल्या भारतासाठीच्या पहिल्या कारचे केमॉफ्लॉज केलेले उत्पादन दाखवले- ही SP2i कार असून तिचे टेस्ट ड्राइव्ह श्री. एन.चंद्राबाबू नायडू यांनी किया मोटर्सच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत केले आणि कियाच्या भारतातील आगमनाबाबत आनंद व्यक्त करून ब्रँडच्या ‘पॉवर टू सरप्राइज‘या तत्वज्ञानाचा पुनरूच्चार केला.किया मोटर्सने ऑक्टो एक्स्पो २०१८ मधून भारतात प्रवेश केला आणि SP2i सोबत जगभरात सादर होणाऱ्या आपल्या १६ गाड्या या प्रदर्शनात मांडल्या. आगामी SP2i ही गाडी कंपनीच्या अंनतपूर येथील कारखान्यात तयार होत आहे. २०१९ च्या उत्तरार्धात हे काम पूर्ण होईल आणि जागतिक स्तराचा दर्जा, अप्रतिम डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ही गाडी तयार होईल. या गाडीची प्रेरणा भारताकडून आणि ‘शक्तिशाली’भारताचा चेहरा असलेल्या‘रॉयलबंगालटायगर’ कडून घेण्यात आलेली आहे. त्यातूनच या गाडीला कियाचे प्रसिद्ध आणि अतिशय अनोखे असे ‘टायगरनोझग्रील’हे वैशिष्ट्य लाभले आहे. चीफ डिझाइन ऑफिसर पीटरसेचर यांनी हे डिझाइन केले आहे. ही गाडी खऱ्या अर्थाने‘मेकइनइंडिया’ आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्पोर्टी, स्टायलिश डिझाइनसह भारतीय ग्राहकाला जशी कार हवी अगदी तशीच ही आहे.
Leave a Reply