
कोल्हापूर: दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दक्षिण भारतातील सर्वात मोठी शिवजयंती कागल मध्ये होत आहे त्याचबरोबर भव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते.परंतु काही दिवसापूर्वी पुलवामा काश्मिर येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात आपले जवान शहीद झाले.आपले कर्तव्य समजुन हल्लात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं रहाणं गरजेच आहे या भावनेतुन आमदार मुश्रीफ साहेबांनी मिरवणूकीचा संपूर्ण खर्च हल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर साहेबांनी पालकमंत्री म्हणून बुलढाणा जिल्हात काम केलं त्या जिल्यातील जवान या हल्यात शहीद झाला त्याच्या कुटुंबीयांना दहा लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते सचिन साबळे यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना 25 लाखाचे दोन बंगले देण्याचे आश्वासन दिले आहे.
Leave a Reply