
कोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखील दलातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २० फेब्रुवारी या दिवशी वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशन आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी मूक तिरंगा समर्थन फेरी काढण्यात आली. ही फेरी सकाळी ११ वाजता मिरजकर तिकटी येथून प्रारंभ झाली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रस्ता, पापाची तिकटी, महापालिका, लुगडी ओळ, बिंदू चौक येथे सांगता झाली. या फेरीत विविध संघटना, तालिम मंडळे, सर्व लोकप्रतिनिधी, ज्ञाती संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच विविध शाळा, समस्त राष्ट्रभक्त कोल्हापुरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कडक उन्हात सहस्रो विद्यार्थी आणि कोल्हापूर यांनी एकजूट दर्शवत राष्ट्रभक्तीचा संदेश देत ‘एक तास जवानांसाठी-एक तास देशासाठी’ हा संदेश दिला.
फेरीत अग्रभागी जवानांना समर्थन देण्यासाठी विशेष सिद्ध करण्यात आलेला रथ होता. याच्या मागे तिरंगा झेंडा घेतलेले शालेय विद्यार्थी, तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी होते. या फेरीत राष्ट्रप्रेम जागृत करणारी गीते लावण्यात आली होती, तसेच नागरिकांना फेरीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. बिंदू चौक येथे फेरीच्या समारोपप्रसंगी वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले. या प्रसंगी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ ‘जलादो जलादो पाकिस्तान जलादो’, अशा उत्स्फूर्त घोषणा देण्यात आल्या. संयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी खाऊ आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्हाईट आर्मीच्या युवकांनी फेरीचे वाहतूक नियमन केले. कुठेही वाहतुकीला अडथळा न करणार्या शिस्तबद्ध फेरीने कोल्हापूरांची मने जिंकली.
राजाराम हायस्कूल, चाटे स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, भक्तीसेवा विद्यापीठ हायस्कूल, नेहरू हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, इंदुमती गायकवाड गर्ल्स हायस्कूल, इंदिरा गांधी विद्या निकेतन, नूतन मराठी विद्यालय, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, स.म. लोहिया ज्युनिअर कॉलेज, रा.ना. सामाणी हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल !
यावेळी वंदे मातरम युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये,सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संभाजी साळुंखे ,श्री अंबाबाई भक्त समितीचे श्री महेश उरसाल , राजेंद्र सूर्यवंशी , पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, ब्राह्मण जागृती संघाचे श्री. स्वानंद कुलकर्णी, शिवसेनेचे श्री. केदार वाघापूरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि शिवानंद स्वामी, शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, युवासेनेचे श्री. ऋतुराज क्षीरसागर, करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. अवधूत साळोखे, भारतीय पत्रकार संघाचे श्री. सुनील सामंत, हिंदु महासभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, जयवंत निर्मळ, बबन हारणे, राजेंद्र शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष दीपाली खाडे, शहाराध्यक्ष रेखा दुधाणे, मनिषा पवार, रा.स्व. संघाचे भागसंघचालक श्री. प्रतापराव दड्डीकर आणि श्री. केशव गोवेकर ,अनिरुद्ध कोल्हापुरे, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाचे श्री. मयुर तांबे, विश्व हिंदु परिषदेचे शहरध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, श्रीपूजक संघाचे अधिवक्ता केदार मुनीश्वर, बाळासाहेब निगवेकर, भाजप, साळोखे फाऊंडेशनचे श्री. बिपीन साळोखे आणि श्री. अतुल साळोखे उपस्थित होते.
Leave a Reply