
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ येत्या शुक्रवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी होत असून आयआयएम, तिरुचिरापल्लीचे संचालक डॉ. भीमराया मेत्री हे प्रमुख पाहुणे असतील, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव असतील. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दुपारी २.०० वाजता हा समारंभ होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी सर्वसाधारण गुणवत्तेसाठीचे मा. राष्ट्रपतींचे पदक विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागातील सत्यजीत संजय पाटील या विद्यार्थ्यास देण्यात येत असल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे मा. कुलपतींचे पदक महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील विद्यार्थिनी साक्षी शिवाजी गावडेहिला जाहीर करण्यात आले.
Leave a Reply