
कोल्हापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज ऐतिहासिक रंकाळा तलावास भेट देऊन तलावाची पाहणी केली, त्यांच्यासमवेत सौ. विनोधा रावही उपस्थित होत्या.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि सौ. विनोधा राव यांना रंकाळ्याचे ऐतिहासिक महत्व आणि पार्श्वभूमी सांगितली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रंकाळा टॉवर येथून संपूर्ण रंकाळ्याची पाहणी केली. रंकाळ्यावरील संध्यामठ, शालीनी पॅलेस, विस्तीर्ण पाणी, मनोरे यांचीही माहिती घेतली.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर सरीता मोरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीधर पाटणकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. दिलिप पाटील, तहसिलदार सचिन गिरी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर,पदाधिकारी,अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply