भारतात प्रथमच 52 वर्षीय महिलेला दुसऱ्या गर्भधारणेमध्ये तीळं जन्माला

 

कोल्हापूर: पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये 52 वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तीळं जन्माला आले. या महिला मुळच्या पुण्यांच्या आहेत. 52 वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तीळं जन्माला येणे असे भारतात प्रथमच आढळून आले आहे.साईश्री हॉस्पिटल, औंधच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये या तीन बाळांचा जन्म झाला असून यामध्ये दोन मुले व एक मुलगी आहे. जन्माच्या वेळी यातील एक बाळाची स्थिती नाजूक होती मात्र आता तिन्ही बाळांची स्थिती उत्तम आहे. हैदराबाद व पुण्यात आयव्हीएफच्या माध्यमातून अनेक वेळा गर्भधारणेचा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले. यावेळी ह्या दाम्पत्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. 

आयव्हीएफच्या माध्यमातून गर्भधारणे मध्ये तीन गर्भ वाढवणे अतिशय धोक्याचे ठरू शकते.यासाठी दोन किंवा एक उत्कृष्ट गर्भ गर्भाशयामध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. हा सल्ला गर्भाच्या योग्य वाढीसाठी उत्तम मानला जातो.
तरीही गायकवाड दाम्पत्याने आपले तिन्ही गर्भ वाढवण्याचा निर्णय घेतला. तीन गर्भाना वाढवण्याचा व जन्म देण्याचा असा निर्णय अतिशय दुर्मिळ आहे.

याबाबत साईश्री हॉस्पिटल आयव्हीएफ तज्ञ डॉ. गिरीश पोटे म्हणाले की, “ या महिला 52 वर्षाच्या असूनही त्यांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे अशा प्रकारची आयव्हीएफच्या माध्यमातून तीळं यशस्वीरित्या जन्माला येणे सोपे होऊ शकले.” ते पुढे म्हणाले की, “ आमच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये उत्कृष्ट टीम कार्यरत आहे. येथे रुग्णांना प्रगत उपचार आणि उत्तम सुविधा प्रदान करतो. मला सांगण्यास आनंद होत आहे की डिसेंबर 2018 पर्यंत आमच्या आयव्हीएफ सेंटर मध्ये 101 बाळांचा जन्म झाला आहे.”
बाळांची आई म्हणाली कि, “साईश्री हॉस्पिटलच्या आयव्हीएफ सेंटरमधून पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळाले आणि तीन बाळांमुळे आमच्या कुटुंबात खरोखर आनंदी क्षण आला आहे.”
या आयव्हीएफ सेंटर मध्ये डॉ. यशवंत माने व डॉ. गिरीश पोटे अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.
साईश्री हॉस्पिटलचे आयव्हीएफ सेंटर सुरु होऊन 16 महिने झाले असून 16 महिन्यात या सेंटरमध्ये 101 बाळांचा जन्म झाला आहे.
यामध्ये एक तीळं, 29 जुळे आणि 40 सिंगल असे बाळ जन्माला आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!