
कोल्हापूर: मधुमेहावर उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी तर्फे आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान हॉटेल जे डब्लू मॅरीयेट, पुणे येथे करण्यात आले आहे.ही चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीने आयोजित केलेली तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद आहे. याचे उदघाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे. भारतात मधुमेह होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 7.4 कोटी भारतीय मधुमेह ग्रस्त आहेत.मधुमेहावर वेळेवर उपचार करून नियंत्रण न आणल्यास किडनी, नस,डोळे आणि हृदय याची हानी होते. मधुमेह व त्यामुळे होणारे विविध आजार व
त्यावरील उपचार या विषयी चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक या परिषदेमध्ये भाग घेणार आहेत.याशिवाय या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत संस्थापैकी कॅरोलिन्सका इन्स्टिटयूट, लुंड विश्वविद्यालय, ओरेब्रो (स्वीडन), मेयो क्लिनिक, व्हर्जिनिया विद्यापीठ आणि मियामी विद्यापीठ (यु.एस.ए), कार्डिफ विद्यापीठ व मॅन्चेस्टर विद्यापीठ(इंग्लंड) या संस्था सहभागी होणार आहेत.भारतातून 50 डाएबेटीस विशेषज्ञ व संशोधक आपले संशोधनपर प्रबंध सादर करणार असून यापैकी एकाला चेलाराम फाउंडेशन डाएबेटीस रिसर्च अवॉर्ड व रोख एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील 1550 डॉक्टर्स या मधुमेह परिषदेला उपस्थित राहणार आहेत.चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे अध्यक्ष लाल.एल. चेलाराम म्हणाले की “चेलाराम मधुमेह संस्था नेहमीच मधुमेह आणि त्याची गुंतागुंत टाळण्याकरिता लढण्यात आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे ह्या क्षेत्रातील नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा हा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे मधुमेहाचे व त्याचे दुष्परिणाम या वरील उपचारांवर मोठा प्रभाव पडेल.”यावेळी चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले की “ या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील विख्यात मधुमेह तज्ञ उपस्थित राहणार आहेत. पाश्चात्य देशांमध्ये मधुमेहाशी तुलना करता भारतात मधुमेह एक वेगळे आव्हान आहे. मला आशा आहे की या परिषदेच्या मध्यमातून भारतातील मधुमेहामुळे ग्रस्त लाखो लोकांना नवीन उपाय मिळेल.”तसेच चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.(ब्रि) अनिल पी पंडीत यांनी सांगितले की “चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी अत्याधुनिक सोई सुविधां बरोबर पोडियाट्री डिपार्टमेन्ट, रिअल-टाइम रेगुलर ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम, इंसुलिन पंप, बेरिएट्रिक सर्जरी, एंडोक्रायोलॉजी, हेमोडायलिसिस केंद्र यासारख्या उपकरणे व सुविधा उपलब्द्ध आहेत. याच बरोबर चेलाराम हे मल्टिस्पेशालिटी केअर असून या मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफथालमीक केअर व प्रगत रेडिओलॉजिकल इमेजिंग इ. चा समावेश देखील आहे.”
या परिषदेत मधुमेहामुळे होणारी ‘पायाची न्यूरोपॅथी’ ही कार्यशाळा हे एक वैशिष्ठ्यपूर्ण सत्र आहे. ह्या कार्यशाळेत मधुमेही व्यक्तीचे पाय कसे तपासावेत तसेच पायांच्या जखमा व व्रण कशाप्रमाणे उपचार करावे ह्याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले जाणार आहे. कमी उष्माकांचा आहार व व्यायाम ह्यांचा वजनामध्ये होणारी घट तसेच मधुमेहापासून मुक्ती ह्यांचा परस्पर संबंध ह्याविषयी चर्चासत्र होणार आहे. तसेच ह्या परिषदेत मधुमेहावरील नवीन उपचार, बेरिएट्रिक सर्जरी, पायातील जंतू संसार्गावरील नवीन उपचार औषधी, थायरोइड ग्रंथीचे विकार, कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) इ. विषयी चर्चा होणार आहे.तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद- 2019 हे वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तकी आणि प्रात्यक्षिक ज्ञान याला जोडणारा एक दुवा ठरू शकेल. तसेच ही परिषद डॉक्टर व संशोधक यांना मधुमेहाच्या नवीन बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी एक वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
Leave a Reply