
कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांचा ब्रेकफास्ट पे चर्चा हा उपक्रम लोकप्रिय झाला असून, खासदारांशी थेट संवाद साधण्यासाठी नागरीक त्यामध्ये सहभागी होत आहेत. गंगावेश परिसरातील सुवर्ण कॅफे मध्ये आज अशीच चर्चा रंगली. झणझणीत मिसळीचा आस्वाद घेत, खासदार महाडिक यांनी उपस्थितांशी बातचित केली. विविध पेठा आणि स्थानिक नागरीकांना आजवर झालेल्या विकासकामांचा तसंच भविष्यातील योजनांची त्यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू राहील, असंही त्यांनी सांगितलं. सर्वच उपस्थितांनी खासदार महाडिक यांच्या कार्याचा गौरव करत, येवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी खासदार महाडिक यांना पाठींबा जाहीर केला.
उत्तरेश्वर पेठेसह विविध मंडळांच्या वतीनं गंगावेश इथल्या रेगे तिकटीला असलेल्या पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या सुवर्ण कॅफे हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना आज निमंत्रित करण्यात आलं होतं. विराज चिखलीकर, राजू माने, कुलदिप माने यांच्या पुढाकारातून ब्रेकफास्ट पे चर्चा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक यांचं सुवर्ण कॅफेमध्ये आगमन झालं. यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माजी उपमहापौर, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. खासदार महाडिक यांनी सुवर्ण कॅॅफेच्या चटकदार मिसळचा विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आस्वाद घेतला. त्यावेळी महाडिक यांनी, भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. दरम्यान धोत्री गल्ली, गणेश प्रासादिक तरुण मंडळ, राजमाता तरुण मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, शिवप्रेमी तरुण मंडळ, रहाटगाडगे तरुण मंडळ, मस्कृती तरुण मंडळ, जयविजय विकास तरुण मंडळ, अजिंक्य तरुण मंडळ यांच्यासह परिसरातील विविध मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खासदार महाडिक यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच मंडळ, संस्था, व्यक्तींनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी उपमहापौर अरुण निगवेकर, नगरसेवक शेखर कुसाळे, किरण शिराळे, प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक संभाजीराव बसूगडे, उदय जगताप, सुरेश सुतार, विश्वास आयरेकर, अमोल भास्कर, दीपक काटकर, हेमंत कांदेकर, अमोल पाटील,विकी महाडिक, विजय मंगोरे, राजू भोसले, सतीश पाटील-घरपणकर, जयेश पाटील, संदीप कसबेकर, इंद्रजीत जाधव, संजय निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान गंगावेश, उत्तरेश्वर परिसरातील अर्पिता राबाडे, दीपा टिंगरे, कविता बाबरे, लता बगाडे, नंदा ओतारी, जयश्री भोसले, सुनीता काकडे,वंदना मोरे, शांताबाई जाधव,प्रभा माताडे, पुष्पा बोळके यांच्यासह अनेक महिलांनी रेगे तिकटी इथं येऊन खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन त्यांना लोकसभा निवडणूकीसाठी पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर शुक्रवार पेठ चौकातील नागराज पेपर स्टॉलला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली.
Leave a Reply