

कॅडल मार्चमर्ध्ये शाळकरी मुले व तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी १०० फुटी तिरंगा बनविण्यात आला होता .यावेळी २५० जणांनी हा तिरंगा हातात घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता कॅन्डल मार्चमुळे बिंदू चौक परिसर उजळून निघाला होता .कॅडल मार्चच्या मार्गावर तिरंग्यास अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती .
कॅन्डल मार्च बिंदू चौक येथे आल्यानंतर बोलताना रगेडियनचे आकाश कोरगावकर यांनी येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व हा हल्ला देशाच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे अशा वेळी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहावे देशांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे असे सांगितले . यावेळी शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले .
या उपक्रमामध्ये फेथ फौंडेशन, जेके ग्रुप, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, हीलींग टच, फिजिओ क्लीनिक, डॉटस अँड डॉटस, आरहता, कोरगावकर पेट्रोल पंप, स्मार्ट ग्रुप, स्टेपअप,एस्टर आधार, इंडोकाऊंट, मनोरमा, कोल्हापूर पब्लिक स्कूल आदी संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला याप्रसंगी उपल शहा, अमोल कोरगावकर ,मोहन कारेकर उपस्थित होते.
Leave a Reply