पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर आवश्यक:उत्पादकांच्या कार्यशाळेतील सूर

 
कोल्हापूर : पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर आवश्यक आहे त्यासाठी उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवली तर हा प्रश्न राहणार नाही असा सूर उत्पादकांच्या कार्यशाळेत व्यक्त झाला. ऑल इंडिया प्लास्टिक मनुफॅक्चरर्स असोसिएशन,इंडियन प्लास्टिक इन्स्टिट्यूट आणि असोसिएशन ऑफ प्रमोशन ऑफ प्लास्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वापर करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच वस्तूंचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे यासाठी वापरातील प्लास्टिक पुन्हा संबधीत यंत्रणेमार्फत पोहोचले पाहिजे असे प्रतिपादन इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक एन्व्हर्नमेंटचे अध्यक्ष सपन रे यांनी केले.  
     भारत सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेप्रमाणे प्लास्टिक उत्पादक  आणि ब्रँड लेबल मालकी असलेल्या उद्योगांना पॅकिंगसाठी वापरलेल्या प्लास्टिकचा वापर झाल्यानंतर परत घेणे बंधनकारक केले आहे.हा नियम प्लास्टिक वापरणाऱ्या प्रत्येक उद्योग-व्यवसायाला लागू आहे डेअरी व्यवसायावरही हे बंधन आहे प्लास्टिक उत्पादन करता येते त्यांचा पूर्ण पुनर्वापर होतो ,पण वापर झालेले प्लास्टिक जन्मा कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे ही जबाबदारी उत्पादकांवर सोपवल्याने हा प्रश्न आणखी कठीण बनत चालला आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हॉटेल पॅव्हेलियन येथे हे चर्चासत्र झाले.   चर्चासत्रास गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती .तर इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक एव्हायर्नमेंटचे अध्यक्ष सपन रे  यांनी यावेळी प्रमुख सूचना दिल्या. 
       महाराष्ट्र राज्याने प्लास्टिक वापराबाबत २०१८ साली एक कायदा तयार केला कायदा जास्तीत चादरी वापर झाला तरी त्यांचा पुनर्वापर करण्याची प्रक्रिया उद्योगांमध्ये उभी राहिली पाहिजे यासाठी मार्केटमध्ये जे प्लास्टिक ग्राहकांपर्यंत पोहोचले जाते परत कसे मिळवायचे हा प्रमुख प्रश्न आहे याबाबत ग्राहक व महापालिका यंत्रणेकडून माहिती घेण्यासाठी राज्यात सर्वत्र याबाबत चर्चा घेतली जात आहेत यातून सर्व माहिती संकलित करून ती राज्य सरकारला कळवले जाणार आहे असे सांगितले
     रिसायल डॉट कॉमनचे चेतन बरेगर यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर डिजिटल सादरीकरण केले .प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करण्याचे काम तेलं गणा आणि तामिळनाडू येथे सुरू आहे यामध्ये ५ टनापासून ३ टन पॅरोलिसिस ऑइल तयार होत आहे.यासाठी वापरले जाणारे मशीन हे महाराष्ट्रातील आहे उद्योगाच्या सर्वच ठिकाणी याचा वापर होऊ शकतो असे सांगितले.
    कायदे अधिकारी यांनी डी.टी.देवळे यांनी  एक्टेनडेड प्रोडूसर रीस्पोंसिबिलिटी(इपीआर) संकल्पना आणि अपेक्षा यावर माहिती दिली .आयपीआयचे डॉक्टर समीर जोशी यांच्या संचालनाखाली तज्ञ पॅनलची चर्चा झाली. यावेळी आयटीआय चे समीर जोशी यांनी बोलताना प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट बाबत प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे सांगितले नितीन गोरे यांनी प्लास्टिक पत्रा पासून इंधन निर्मिती करणे शक्य आहे यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले यावेळी गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्लास्टिक बंदी मुळे दूध व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे दुधाच्या पिशव्या परत मिळवण्याचे आवाहन केले आहे असे सांगितले
 महापालिकेतील कचरा व्यवस्थापनाबाबत आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सहभाग घेतला.यावेळी किशोर संपत  अनिल नाईक  यांनीही मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन किशोर संपत यांनी केले ताज मुलांनी यांनी उपस्थित यांची माहिती करून दिली व आभार सत्यजित भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!