लोकांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या ‘कॉक्स अँड किंग च्यावतीने पर्यटनप्रेमींसाठी अनेक पर्याय 

 

कोल्हापूर : कॉक्स अँड किंग ही अनेक देश व खंडांमध्ये पर्यटन सेवा देणारी जगप्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीच्या वतीने उद्या 24 फेब्रुवारी रोजी हॉटेल पर्ल येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ दरम्यान कोल्हापूर मधील पर्यटन प्रेमींसाठी आश्चर्यकारक पर्याय सादर होणार आहेत. यामध्ये सुट्ट्यामधील जगभरातील वेगवेगळे पर्यटन पर्याय तसेच भारतातील आणि जगभरातील सर्वात महत्त्वाची ठिकाणे याविषयी उत्कृष्ट ऑफर्स व वेगवेगळ्या सवलती देण्यात येणार आहे. कंपनीच्या वतीने खास प्रवासी ऑफर्सची घोषणा केली आहे. जीएसटी फ्री हॉलिडे, फ्री ऑन बुकिंग ऑफ हॉलिडे, मुलांसाठी विनामूल्य प्रवास अशा वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच काही भाग्यवान ग्राहकांना थायलंड सिंगापूर, मॉरिशस आणि बाली येथे विनामूल्य हॉलिडे जिंकण्याची संधीही उपलब्ध आहे. भारत देखो सुट्टीच्या बुकिंग वर गिफ्ट व्हाऊचर मिळणार आहेत. तसेच एका भाग्यवान ग्राहकाला एअर अरेबियाच्या विमानातून ‘बाकु’ला फ्री एअर ट्रॅव्हल्सची लॉटरी लागू शकते. कॉक्स अँड किंग्ज ने सादर केलेल्या मराठी पर्यटकांच्या ‘आम्ही ट्रॅव्हलकर’ या खास टूर्स चे मुख्य आकर्षण उद्या असणार आहे. मराठी माणसासाठी आपली वाटणारी ही टूर असणार आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मराठी भोजन तसेच मैत्रीपूर्ण, उत्साही आणि काळजीपूर्वक मराठी बोलणाऱ्या पर्यटन व्यवस्थापकांची साथ असणार आहे.
तसेच युरोप, जपान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि रशिया अशा इतर बऱ्याच स्थळांसाठी मनोरंजक उन्हाळी पर्यटन प्रदर्शन असणार आहे. अंतरराष्ट्रीय व्यतिरिक्त देशांतर्गत हिमाचल, सिक्कीम दार्जिलिंग, भूतान , लडाख, केरळ अशा विशेष पर्यटनाचे पर्यायदेखील समाविष्ट आहेत. लोक स्वतःच्या इच्छेने व सवडीने प्रवास करू शकतात. उद्या दहा ते आठ या वेळेत सामान्य लोकांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. तसेच हे पूर्णपणे विनामूल्य आ. तरी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक रंजन मूर्ती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पर्ल हॉटेल च्या संचालिका कविता घाटगे यांनी कॉक्स अँड किंग यांच्या टूर्स गुणवत्तापूर्वक, लोकांची स्वप्ने पूर्ण करणार्‍या असतात. म्हणून त्याची फ्रांचायजी पर्ल हॉटेल घेतली आहे याचे प्रदर्शनउद्या भरवण्यात येणार आहे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!