मदन्नपल्ली येथे शिवजयंती साजरी

 

आंध्रप्रदेश : मदन्नपल्ली (आंध्रप्रदेश) येथील चित्तूर बसस्टाफ चौकात अत्यंत जोशपूर्ण कट्टर शिवभक्त, कट्टर मावळ्यांनी प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी केली.

यावेळी मदन्नपलीचे श्री व्यकंटरमणा स्वामी देवस्थान समितीचे अध्यक्ष रेडप्पा कल्याणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर काश्मीर !!पुलवामा!! येथील भ्याड हल्याचा निषेध करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात अली. यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक श्री अशोक मोरे (स्थानिक मावळा) व विलास निकम ( विटा-सांगली ) यांनी जय भवानी !!जय शिवाजी!! घोषणा देत मोटर सायकल रैलीला सुरुवात केली. यावेळी श्री आनंद मराठे यांच्याकडून मोटर सायकल रैलीला भगवा ध्वज दाखविण्यात आला, या रैलीची सुरुवात चित्तूर बसस्टाफपासून ते टाऊन, बेंगलोररोड ते भाजीमार्केट, NTR सर्कल, नेहरूनगर, ब्रह्मास्ट्रेट, करत RTC स्टेशन, मार्गे पुन्हा चितूर चौक येथे या रैलीचीची सांगता करण्यात आली. तब्ब्ल दोन तास रैलीला वेळ लागला तसेच दीडतास कार्यक्रम होता. पण यामध्ये सुद्धा सर्व मदन्नपलीतील शिवभक्त मावळ्याचा जोश वाखण्याजोगा होता. कडक उन्हं असतानाही एकही व्यक्तीचा जोश कमी होत नव्हता, सर्वजण तहानभूक विसरून हरवून गेले होते, यामुळे संपूर्ण मदन्नपली शिवमय झाल्यासारखे वाटत होते.

यावेळी विश्व् हिंदू परिषदचे संघटनमंत्री राजेशवर रेड्डी, राजगोपालरेड्डी, प्रशांत कल्याणकर, मछिंद्र, शिवानंद, चक्रवर्ती, गुणोभूषण, मुनीतेजा, अशोक, पवन, महेश, पार्थव, सुश्मिता सुवर्णलक्ष्मी, विलास निकम, शेखर जाधव, उमेश जाधव, लक्ष्मणराव जाधव, नागराज सूर्यवंशी, महाराष्ट्राचे मावळे श्री आनंद मराठे ,पत्रकारभूषण सचिन कांबळे, गोविंद अंबाटे, रामकृष्ण गाताडे, गणेश इंगळे, इत्यादी उपस्थितीत होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार श्री अशोक मोरे ( छत्रपती शिवाजी राजेंच्या काळातील स्थानिक मावळे) यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!