
कोल्हापूर: शिक्षण आणि संवादातून आपला पारंपरिक उद्योग आणखी वाढेल, असे मत प्राध्यापक शैलेश काळे यांनी व्यक्त केले.
वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आपला पारंपरिक व्यवसाय कसा वाढविता येईल, या विषयावर येथील रेसिडेन्सी क्लब येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आपला पारंपरिक व्यवसाय वाढविण्यासाठी योग्य असे शिक्षण आणि त्याला संवादाची दिशा मिळाली तर व्यवसाय आपोआप वाढेल.
वेलिंगकर संस्थेचे डॉ. समीर कारखानीस यांनी संस्थेविषयी माहिती देऊन संवादाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीची कौशल्ये स्पष्ट केली. येथील सराफ व्यावसायिक पुष्कराज चिपडे आणि साक्षी पोरे यांनीही संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर कशा प्रकारे आत्मविश्वास वाढत गेला याविषयीचे मनोगत केले, तर उपस्थित उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी प्रश्तोतराच्या माध्यमातून कार्यशाळेमध्ये भाग घेतला.
यावेळी बन्सीधर चिपडे, मुरलीधर चिपडे, सचिन शानभाग यांच्यासह मोठया संख्येने व्यावसायिक व विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, बेळगावमध्येही आपला पारंपरिक व्यवसाय कसा वाढविता येईल यावर श्री. काळे यांनी मार्गदर्शन केले. तेथील पियूष चांडक यांनीही आपले अनुभव यावेळी शेअर केले. यावेळी केएलएस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह उद्योजक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply