
कोल्हापुुर :आपल्या सर्वांचे लाडके , अभिनेते, गायक, संगीतकार, उत्तम डान्सर असलेले
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर हे खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय हलकाफुलका, कौटुंबिक चित्रपट ” “अशी हि आशिकी ” टि सेरीज व सुप्रिया सचिन पिळगावकर निर्मित “अशी ही आशिकी” या चित्रपटाचे लेखन , दिग्दर्शन आणि प्रथमच संगीत दिग्दर्शनही केले आहे हे खुद्द सचिन पिळगावकर यांनी केले आहे.५ वर्षानंतर सचिन पिळगावकर यांनी या एका नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.व वैशिष्ट्य म्हणजे सचिन पिळगावकर प्रथमच म्युजिक डायरेक्टर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच पदार्पण करत आहेत.१ मार्चला चित्रपट महाराष्ट्रातील ६०० चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात नायक आहेत अभिनय बेर्डे जो ती सध्या काय करते या चित्रपटात बालकलाकार म्हणून पुढे आला होता आता अशी ही आशिकी या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत प्रथमच काम करत आहे. आणि नायिका आहे
कोल्हापूरातील तो चेहरा आहे मिस इंडिया अभिनेत्री हेमल इंगळे हिचाहेमलने दहावीला ९४% गुण मिळवून सुद्धा कला क्षेत्रात काहीतरी करायचे म्हणून आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. २०१५ मध्ये ती मिस यूनिवर्सिटी इंडिया झाली.
त्यानंतर २०१६ ला मिस अर्थ इंडिया फायर आणि मिस इंडिया एक्श्विजिट – क्विन फॉर अ कॉज ठरली.
नुकताच तिचा ‘ हुषारु’ नावाचा तेलगु चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता ती “अशी हि आशिकी” या एका नव्या चित्रपटात नायिका म्हणून पुढे आली आहे हा चित्रपट नव्या जमान्यातील युवकांची प्रेम कहाणी आहे. या मराठी चित्रपटात तिला प्रथमच काम करण्याची संधी सचिन पिळगावकर यांनी दिली आहे.
या चित्रपटात एकूण ५ गाणी आहेत या याचं टायटल सॉंग स्वित्झरलैंडमध्ये चित्रित करण्यात आले आहे.चित्रपटातील गाणी गायक सोनू निगम आणि प्रियांका बर्वे यांनी गायिली आहेत.
अभिनेत्री हेमल इंगळे हि आपल्या कोल्हापूरातील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी श्री. देवेंद्र इंगळे यांची कन्या आहे. आपल्या परिवारातील एका मुलीला मराठी चित्रपटात एवढी मोठी संधी मिळाली आहे आणि तिनं त्या संधीचं सोनं केलं आहे, याचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे असे तिचे वडील देवेंद्र इंगळे यांनी सांगितले आहे.
तिला प्रोत्साहन म्हणून आपण सर्वांनी अशीही आशिकी हा सिनेमा पहावा असे आवाहन करण्यात आले आहे.
१ मार्च रोजी महाराष्ट्रातील जवळजवळ ६०० चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply