
कोल्हापूर: उद्यमनगरी अशी ख्याती असणार्या कोल्हापुरातील उद्योजकांना सध्या विविध समस्यांना तोंड दयावं लागत आहे. याबाबत संसदेत आवाज उठवून त्या मार्गी लावण्याचा मनोदय खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या वतीनं आयोजित ब्रेकफास्ट पे चर्चा या अभिनव उपक्रमात ते बोलत होते. जिल्हयातील उद्योजक येत्या लोकसभा निवडणूकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर आणि मानद उपाध्यक्ष अतुल आरवाडे यांनी दिली.
खासदार धनंजय महाडिक यांनी मिसळ पे चर्चा, ब्रेकफास्ट पे चर्चा या उपक्रमातून जिल्हयातील सर्वच घटकांशी थेट संवाद साधत आहेत. त्या माध्यमातून या घटकांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपला कृती आराखडा, नियोजन याबाबत माहिती देत आहेत. गेल्या साडेचार वर्षात स्थानिक पातळीपासून देशपातळीपर्यंतचे १ हजार १५५ प्रश्न खासदार महाडिक यांनी केंद्रीय पातळीवर उपस्थित केेले आहेत. त्यांच्या या कामगीरीची दखल घेऊन सलग तिसर्यांदा त्यांना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानीत केल्यामुळं जिल्हयाचं नाव देशात उंचावलंय. म्हणूनचं खासदार महाडिक यांना सर्वच स्तरातून उत्स्फुर्तपणेे पाठींबा जाहीर होत आहे. आज कोल्हापूर इंजिनीअरींग असोसिएशननं खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत मिसळ पे चर्चा हा उपक्रम आयोजित केला होता. असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, मानद उपाध्यक्ष अतुल आरवाडे यांच्यासह असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ आणि मान्यवर उद्योजकांनी खासदार महाडिक यांचा संसदरत्न पुरस्कारबद्दल सन्मान केला. वाडीकर यांनी जिल्हयातील उद्योजकांना सध्या भेडसावणार्या समस्यांचं सविस्तर विवेचन केलं. यामध्ये जिल्हयातील औद्योगीक वसाहती सुधारण्यासाठी विशेष पॅकेज दयावं, एफएसआय वाढवून दयावा, वीजदर वाढ रद्द करावी, विमानसेवा पुर्ण क्षमतेनं अखंडपणे सुरू ठेवावी, ईएसआय हॉस्पिटल पुर्ण क्षमतेनं सुरू करावं, यांच्यासह अन्य मागण्या खासदार महाडिक यांच्या समोर मांडल्या. यावेळी बोलताना खासदार धंनजय महाडिक यांनी, कोल्हापुरचा रेल्वे प्रश्न, हवाई सेवा, ईएसआय हॉस्पिटल, पासपोर्ट कार्यालय, पर्यायी शिवाजी पुल, महिलांची सुरक्षा यासह अन्य प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय स्तरावर केलेल्या अथक प्रयत्नांची माहिती दिली. चार दिवसापुर्वी विमानतळाची संरक्षण भिंत विरोधकांनी केवळ राजकीय द्वेशातून पाडल्याबद्दल खंत व्यक्त केली. उद्योजकांच्या सर्व मागण्या मार्गी लावण्याला आपलं प्राधान्य राहील, अशी ग्वाही दिली. अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी असोसिएशनच्या माध्यमातून येत्या लोकसभा निवडणूकीत खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Leave a Reply