
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व विधानसभा मतदार संघामध्ये आज भाजपा“विजय संकल्प बाईक रॅली”आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर उत्तर मतदार संघात ही बाईक रॅली गांधी मैदान येथून सकाळी ११.३० वाजता सुरु करण्यात आली. प.म.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई, यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली.
या “विजय संकल्प बाईक रॅली”मध्ये सुरुवातीस देशाचे पंतप्रधानमा.नरेंद मोदी यांची प्रतिमा असलेला चित्ररथ तयार करण्यात आला होता. २०१९ साली पुन्हा एकदा नरेंद मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शहरभर हि रॅली फिरत असताना वंदे मातरम, भारत माता की जय, या घोषणांनी रॅलीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात विविध ठिकाणी नागरीकांनी या रॅलीचे उत्फूर्त स्वागत केले. शहरातून प्रमुख मार्गावरून फिरून या रॅलीची सांगता पुन्हा गांधी मैदान चौक येथे करण्यात आली.यावेळी सरचिणीस दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, मारुती भागोजी, सुरेश जरग, श्रीकांत घुंटे, आर.डी.पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, अॅड.संपतराव पवार, अप्पा लाड, संदीप कुभार, संजय सावंत, नचिकेत भुर्के, दिग्विजय कालेकर, विजय अगरवाल, मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, डॉ.राजवर्धन, संतोष माळी, आशिष कपडेकर, सतीश घरपणकर, विवेक कुलकर्णी, हेमंत कांदेकर, गणेश खाडे, नजीर देसाई, मुसाभाई कुलकर्णी, प्रवीणचंद्र शिंदे, चंद्रकांत घाटगे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, गायत्री राउत, प्रमोदिनी हर्डीकर, वैशाली पोतदार आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply