आंबा विक्रीसाठी जी आय मानांकनाचा वापर करा : सुरेश प्रभू

 
नवी दिल्ली:सध्या आंब्याचा सीजन सुरु होत असून जगभरातून कोकणच्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी बाजारात येताना दिसत आहे . बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली इतर प्रजातीचे आंबे विकताना निदर्शनात आले आहे हि फसवणूक टाळण्याकरीत आणि अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  उत्पादनाचा दर्जा  राखण्या करीत जी आय मानांकनाचा वापर करावा असे आवाहन केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी केलेले आहे.
आंब्याचा राजा असलेला अल्फान्सो, महाराष्ट्रात हापूस म्हणून ओळखला जातो. या आंब्याच्या अद्वितीय चवीमुळे आणि त्याचा दरवळ आणि रंगामुळेही स्थानिक बाजारपेठांबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याला मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड आणि आसपासच्या परिसरातल्या हापूस आंब्याला भौगोलिक संकेतक म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे.
 
विशिष्ट भौगोलिक प्रदेशातली उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो. यामुळे दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते. जगातलं सर्वात लोकप्रिय फळ असलेला हा हापूस जपान, कोरिया, युरोपसह विविध देशात निर्यात केला जातो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या नव्या बाजारपेठाही आता हापुससाठी प्राप्त झाल्या आहेत.
कोकणातील आंबा उत्पादकांनी लवकरात लवकर आपल्या आंबा उत्पादनाचे जी आय मानांकन मिळवण्याकरिता (GI REGISTRY) *अधिकृत संस्था* कडे नोंदणी करावी, असे केंद्रीय मंत्री  श्री सुरेश प्रभू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!