विद्यापीठात ३० डिसेंबरला ‘अन्वेषण’ विद्यार्थी संशोधन महोत्सव

 

20151117_205227-BlendCollageकोल्हापुर : संशोधन हाच शाश्वत विकासाचा पाया  असून नवीनतम संशोधन समाजातील प्रश्नांना सोडविण्याचे काम करते.  विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरिता भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली (ए.आय.यू.) यांच्यातर्फे येत्या ३० डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठात ‘अन्वेषण: विद्यार्थी संशोधन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी १० वाजता सदर संशोधन स्पर्धेस विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात प्रारंभ होईल.

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना देऊन समाजाच्या प्रश्नांवर उपाय शोधले जावेत, असा स्पर्धेचा उद्देश आहे. विद्यापीठ स्तर, विभागीय स्तर व राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यांत ही स्पर्धा घेतली जाणार असून विद्यापीठ स्तरावरील प्राथमिक स्पर्धा ३० तारखेला होणार आहे. कृषी, मुलभूत विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, फार्मसी तसेच सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या, वाणिज्य व कायदा अशा मुख्य पाच प्रकारांत स्पर्धा होईल. सदर स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होतील. वर्किंग मॉडेल, लाइव्ह डेमोन्स्ट्रेशन, पोस्टरच्या सहायाने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पांचे वैज्ञानिक विचार, नवकल्पकता, कौशल्य आदी मुद्द्यांवर मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास बिकानेर येथे १२ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त संशोधक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन समन्वयक डॉ. ए. एम. गुरव केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी तंत्रज्ञान अधिविभागाचे स्पर्धा समन्वयक हर्षवर्धन पंडित (९८६०८३९११७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!