
कोल्हापूर :प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डॉ डी वाय पाटील ट्रस्ट यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 ते 11 मार्च या कालावधीत गृहिणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचा शुभारंभ 8 मार्च रोजी सकाळी सात वाजता महिलांचे आरोग्य ही संकल्पना घेऊन महिला आणि युवतीच्या प्रबोधनात्मक भव्य रॅलीने होणार आहे. या रॅलीची सुरवात गांधी मैदान इथून होणार आहे. अशी माहिती सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी पत्रकात बैठकीत दिली.
महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डॉ डी वाय पाटील ट्रस्टतर्फे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गृहिणी महोत्सवाचं आयोजन 8 मार्च ते 11 मार्च या कालावधीत निर्माण चौकात करण्यात आलंय. गृहिणी महोत्सवाचे यंदाचे हे 15 वे वर्ष आहे. या गृहिणी महोत्सवाची सुरवात महिलांचे आरोग्य ही संकल्पना घेऊन 8 मार्च रोजी महिलांच्या भव्य अशा प्रबोधनात्मक रॅलीने होणार आहे. ही रॅली गांधी मैदान ते बिंदू चौक या मार्गावर काढण्यात येणार आहे. या भव्य दिव्य अशा प्रबोधनात्मक रॅलीत 200 महिलांचे ग्रुप सहभागी होणार आहेत. या प्रबोधनाकत्मक रॅलीला सकाळी आठ वाजता गांधी मैदान इथून पुलवामा घटनेतील शाहिद झालेल्या वीरजवानांना देशभक्तीपर गीते आणि नृत्याविष्कारातून अभिवादन करून सामाजिक कार्यकर्त्या डॉ शीतल आमठे यांच्या हस्ते सुरवात होणार आहे. अशी माहिती प्रतिमा सतेज पाटील यांनी या पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी डॉक्टर संगीता निंबाळकर यांचे महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यानंतर महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. तर सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते गृहिणी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 2 आणि 3 मार्च रोजी हॉटेल सयाजी इथं घेण्यात आलेल्या नृत्याविष्कार, फॅशन शो आणि मिसेस गृहिणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. याच दिवशी या गृहिणी महोत्सवांतर्गत दुपारी दोन वाजता पुष्परचना आणि रांगोळी स्पर्धा होणार आहे. तर 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पाककृती आणि नववधू मेकअप स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी सात वाजता सोनी मराठी प्रस्तुत जल्लोष लोकसंगीताचा हा कार्यक्रम होईल. यामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि श्रुती मराठे सहभागी होणार आहेत. तर 10 मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजता स्पॉट गेम्स आणि होम मिनिस्टर या स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता लाईव्ह म्युझिक शो होणार असून या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या सहा महिलांचा गृहिणी गौरव म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. तर मिस वर्ल्ड युक्ता मुखी यांच्या हस्ते आणि फेमिना मिस इंडिया नूतन वायचळ यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या गृहिणी महोत्सवात महिला बचत गटांनी बनविलेल्या पदार्थांच्या विक्रीचे सुमारे 100 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच उपयोगी वस्तू आणि उत्पादनाचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी दिवसभर हे प्रदर्शन खुले राहणार आहे. त्यामुळे या ग्रहणी महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त महिला नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी या पत्रकार बैठकीत केलं.
Leave a Reply