सरसकट’ हा शब्द सरकारने लक्षात ठेवला नाही: माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

 

कोल्हापूर: शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली गेली. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. आत्ताच्या सरकारने सामान्य जनतेबरोबर शेतकऱ्यांची ही फसवणूक केली आहे. सरसकट हा शब्द सरकारने लक्षात ठेवला नाही अशी सडेतोड टिका आज कोल्हापुरात माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व बुथ अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

  राफेलसंबंधीची कागदपत्रे संरक्षण खात्यात सुरक्षित असायला पाहिजेत. पण एवढ्या मोठ्या व्यवहाराची कागदपत्रे कशी चोरीला जातात असा सवालही त्यांनी केला. 16 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आणि त्यांच्याच वकिलांनी हे आरक्षण कसे चुकीचे व घटनाबाह्य आहे हे सिद्ध करायचे. म्हणजे एका हाताने द्यायचे आणि एका हाताने काढून घ्यायचे ही कूटनीती सरकारची आहे. दोन कोटी नोकऱ्यांचे आमिष दाखवले पण रोजगाराची एकही संधी उपलब्ध केली नाही. उलट डान्सबारला परवानगी देऊन ते सुरू केले. अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले, घोषणा केल्या पण गेल्या पावणे पाच वर्षात एकही काम पूर्ण केलेले नाही. आणि जनतेची फसवणूक मात्र केली. हे सरकारच फसवे आहे. यामुळे एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज असल्याचेही नामदार पवार यांनी सांगितले. कोल्हापुरातून सुरू होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारचा संवाद साधला जाणार आहे. यामुळे पक्षाला अजून बळकटी येईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!