कोल्हापूर: नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी रस्ता विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट झाल्याने या गावातील ग्रामस्थांना कायमस्वरूपी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतच निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आल. विमानतळ विस्तारीकरणामध्ये, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी रस्ता समाविष्ट करण्यात आलाय. वर्षानुवर्ष सुरु असणारा हा रस्ता संरक्षण भिंतीच्या आतमध्ये घेण्यात आलाय. त्यामुळ नेर्ली, तामगाव आणि उजळाईवाडी या गावातील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी या गावातील ग्रामस्थांना कायमस्वरूपी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आमदार सतेज पाटील
यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतच निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आल. गोकुळ शिरगाव मधून पर्यायी रस्त्या प्रस्तावीत करण्यात आलाय. मात्र हा रस्ता गैरसोयीचा असल्याचही यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल. ज्या ठिकाणाहून पर्यायी रस्ता सुचविण्यात आलाय. त्या रस्त्यावरून अवजड वाहने जावू शकत नाहीत. त्यामुळ हा पर्यायी रस्ता ग्रामस्थांना मान्य नसून, रस्ता न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तसच ज्या शेतकऱ्यानी आपल्या जमिनी विमानतळासाठी दिल्या आहेत, त्यांना नोकर भरती आणि व्यापारी संकुलातील ठेक्यामध्ये प्राधान्य देण्यात याव, तसच विमानतळ प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात यावेत, विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला नोकरीत समावून घ्याव यासह इतर मागण्याही यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांचेकड करण्यात आल्या. यावेळी राजू माने, नारायण पोवार, के.वाय.पाटील, दिपक जाधव, सर्जेराव मिठारी, प्रकाश पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Leave a Reply