
कोल्हापूर : टोयोटा किर्लोस्कर मोटरने महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारित करण्यासोबत आपल्या ३६५ डिलरशिपचे उदघाटन कोल्हापूर येथील सोनक टोयोटा येथे केले आहे. कोल्हापूर येथील नवीन अनावरणासोबत ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार 3 एस (सेल्स, सर्व्हिस अँड स्पेअर्स) आणि जागतिक दर्जाच्या सोयींसह सुसज्ज केले आहे.।टोयोटा किर्लोस्कर मोटारचे व्यवस्थापकीय संचालक श्री.मासाकाझू योशिमुरा, आणि सोनक टोयोटाचे डीलर प्रिंसिपल श्री. विकास गोदरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा ११,६०० चौ. मीटर्स इतका विस्तार केला असून दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील ग्राहकांना सेवा पुरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र टोयोटा ब्रँडशी संबंधित प्रत्येक ग्राहकांसाठी सर्वात आनंददायक असा कार खरेदी आणि मालकी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सोनक टोयोटा यांनी सर्व आधुनिक सुविधा आणि सुशिक्षित प्रशिक्षित व्यावसायिकांसह सर्व्हिस टीम सुसज्ज केली आहे .या व्यतिरिक्त भारतात संपूर्ण टोयोटा उत्पादनांची किरकोळ विक्री करण्यासोबतच,या नवीन डिलरशिप मध्ये ग्राहकांना पूर्णपणे एक्सप्रेस सर्व्हिसिंग,बॉडी आणि पेंट दुरुस्ती आणि इतर मूल्यवर्धित सर्व्हिससह सर्व्हिंग स्पेसमध्ये विशिष्ट ऑफरची सुविधा देईल. ही सर्व्हिस टोयोटाद्वारे सर्वोत्तम टेक्निकल इन्स्टिट्यूट्सच्या व्यावसायिकांकडून घेतली जाते आणि जागतिक मानकांच्या अद्वितीय कौशल्य प्रशिक्षणांद्वारे सतत वाढविण्यात येते. तसेच यातील डीलर कर्मचाऱ्यांना टोयोटा ग्लोबल ट्रेनिंग सर्व्हिस सिस्टीमद्वारे प्रशिक्षित केले जाते आणि हाय-टेक टूल्स आणि उपकरणासह अॅडव्हान्स कार सर्व्हिसेस वितरीत करण्यासाठी सुसज्ज केले आहे.टोयोटाला ग्राहकांसाठी केंद्रीकृत पुढाकार जाहीर करतांना आनंद होत असून , बेस्ट-इन- टाऊन लक्ष्याचा भाग म्हणून बेस्ट आणि इंनोवेशन्स साध्य केले आहे. आपल्या ग्राहकांसाठी अपेक्षितांपेक्षा अधिक मूल्य वितरीत करण्यासाठी तसेच सर्वात उल्लेखनीय अनुभव प्रदान करण्यासाठी टोयोटाने हा मार्ग शोधला आहे.या उद्घाटनप्रसंगी बोलताना सोनक टोयोटाचे डीलर प्रिन्सिपल श्री. विकास गोदरा यांनी सांगितले की, ” कार निर्मितीतील जागतिक पायनियर पैकी एक असलेल्या टोयोटाशी भागीदारी करणे खरोखरच आमचे उद्दीष्ट आहे,तसेच आम्हाला टोयोटाच्या भारताच्या प्रवासात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही टोयोटा किर्लोस्कर मोटारचे आभार मानतो,टोयोटाच्या बांधिलकी सोबत आम्ही आमच्या ग्राहकांना पूर्ण सुविधांसह सर्वोत्कृष्ट खरेदी आणि सेवांच्या ऑफरचा अनुभव घेता येईल. आम्ही क्षेत्रातील लोकांसाठी टोयोटाची ग्लोबल स्टैंडर्ड प्रोडक्ट आणि सर्व्हिस आणण्यासाठी आनंदित आहोत. आम्ही ग्राहकांची उच्चतम पातळीची खात्री करुन देतो आणि ब्रांडच्या विश्वसनीय प्रतिमेस सशक्त करून टोयोटाच्या ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो.”या नवीन डीलरशिप उद्घाटनप्रसंगी बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक श्री.मासाकाझू योशिमुरा, हे म्हणाले की ,”आमच्या ग्राहकांच्या जवळ पोहचण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या टोयोटाचे उत्पादन वितरीत करण्यासाठी सोनक टोयोटा येथे नवीन डीलरशिप सुरु करणे हा आमचा एक महत्वाचा माईलस्टोन आहे. तसेच अशा प्रकारे आनंददायक अनुभवाद्वारे कायमस्वरुपी आमचे ग्राहक आमच्याशी जोडले गेले आहेत.महाराष्ट्र राज्यातील आमच्या जाळ्याचा विस्तार करतांना आम्हाला आनंद होत असून, आमच्यासाठी पश्चिम भागातील ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे, अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या विभागात स्ट्रॅटेजिकली स्थापित नेटवर्क सेट-अपद्वारे प्रगत सुविधा आणि गुणवत्ता सेवा प्रदान करण्याचा आमच्या दृष्टिकोन एकत्रित केला आहे. आमचा डीलर भागीदार म्हणून, सोनक टोयोटाला या प्रमुख बाजारपेठेची चांगली समज आहे आणि’कस्टमर फर्स्ट’ या दृष्टिकोनातून उच्च-गुणवत्तेच्या सेवेवर टोयोटाने लक्ष्य केंद्रित केले आहे.आम्हाला विश्वास आहे की कोल्हापूरमधील हे अत्याधुनिक शोरुम या क्षेत्रातील टोयोटा कारच्या वाढत्या मागणीची पूर्तता करुन ग्राहकांना टोयोटा ब्रँडसह कारच्या प्रीमियम मालकीचा आनंद घेण्यास सक्षम करेल.टोयोटा किर्लोस्कर मोटरने देशातील नवीन डीलरशिप उघडल्यानंतर देशातील ३६० पेक्षा अधिक ग्राहक टच पॉईंट्स झाले आहेत. तसेच क्यूडीआर [गुणवत्ता-टिकाऊपणा-विश्वसनीयता] साठी मान्यताप्राप्त असून,टोयोटा लाखो ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू आणि मनाची शांती आणत आहे. “कस्टमर ब्रिन्ग द फर्स्ट प्रायॉरीटी’ अंतर्गत टोयोटा विविध प्रकारच्या वाहनांच्या नवीन उत्पादनांविषयी नवीन पॅन इंडिया डीलर नेटवर्कसह आपल्या सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांपर्यत परिणामकारकपणे आणि प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
Leave a Reply