कोल्हापूर : ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कर्तुत्ववान अशा सर्वच स्त्रियांच्या कार्याचा या दिवशी गौरव होत असतो. आजच्या घडीला महिला पुरुषांच्या एक पाउल पुढे जावून कामगिरी करताना आपणांस पहावयास मिळते. महिलांना कोणत्याच क्षेत्रात कमी लेखू नये, महिला दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळतात, अशा आशयाचा एक अनोखा संदेश देण्याकरिता उद्या महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे चालणारे दैनंदिन काम शिवसेना महिला आघाडी आणि भगिनी मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. नोकरदार, कर्मचारी, विध्यार्थी, व्यापारी यांच्यासह महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेचे काम उल्लेखनीय आहे. महिलांनी स्वावलंबी बनावे, महिला बचत गटांना उभारी मिळून बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी भगिनी महोत्सवासह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यासह शहरात महिलाच्या रोजगारासाठी गारमेंट पार्क उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिलांच्या कर्तुत्वाच्या सन्मानाबरोबरच त्यांचे सक्षमीकरण करण्याचे सामाजिक काम आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून घडत आहे. महिलांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना महिला आघाडी नेहमीच लढत आली आहे. एकीकडे महिलांवरील अन्यायास विरोध करताना महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणून आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून महिलांना एक हजार हेल्मेट मोफत वाटप करण्याची कौतुकास्पद काम करण्यात आले आहे.आजच्या घडीला महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे महिलांनी दाखवून दिले आहे. महिला दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतात. अशाच पद्धतीचा एक अनोखा संदेश देण्याकरिता शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे होणारे दैनंदिन कामकाज शिवसेना महिला आघाडी आणि भगिनी मंचच्या महिला सदस्यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या उपक्रमास उद्या शुक्रवार दि. ०८ मार्च २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरवात होणार आहे, अशी माहितीही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
Leave a Reply