जेएसटीएआरसीचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

 

IMG_20151229_105322कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित जेएसटीएआरसी या तायक्वांदोचे प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीने गुजरात येथे झालेल्या ओपन नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या स्पर्धेत तब्बल ६ गोल्ड,३ सिल्वर आणि ३ ब्रॉंझ पदके मिळवून चॅम्पियनशिपचा मान पटकावला आहे.स्पर्धेत सलील कुलकर्णी,रोहीत खुडे ,प्रणित माने,ऋषिकेश इटगी,शिवराज शिंदे,अक्षता सावंत यांनी गोल्ड तर,प्रशांत पुकळे,आकाश सणगर,जयकुमार कर्दानी यांनी सिल्वर आणि मोहम्मदसाद मोमीन,बद्रीप्रसाद कदम,हॅप्पी त्रंबाडीया यांनी ब्रॉंझ मेडल मिळवून विजेतेपद सिद्ध केले. जेएसटीएआरसी ही अकादमी गेली ८ वर्षे क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून देश तसेच देशाबाहेरील स्पर्धांमधूनही या संस्थेने विजेतेपद मिळवले आहे. येथील सर्व विजेत्या विदयार्थ्याना प्रशिक्षक निलेश जालनवाला आणि अमोल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!