
कोल्हापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वराज्य सामाजिक संस्थेमार्फत वि.स.खांडेकर प्रशाला, शाहुपुरी येथे फक्त मुलींसाठी हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा इयत्ता ५ ते ७ आणि इयत्ता ८ व ९ वी अशा दोन गटात घेण्यात आल्या. स्पर्धेत शाळेतील ३३९ मुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेत
५ ते ७ वी गट- (१) सुहानी संभाजी पाटील(७ वी), (२) आफिया अस्लम अत्तार(५ वी), (३) विनंती दगडू रायकर(७ वी)
८ व ९ वी गट- (१) सोनाली मोहन चव्हाटेकर(९ वी), (२) यल्लवा महालिंग आंबी(९ वी), (३) दिक्षा युवराज कुंभार(९ वी) विजेेत्या ठरल्या.
स्पर्धेतील विजेत्या मुलींना रोख बक्षीस आणि मेडलचे वाटप कागल तालुका नगर भूमापन अधिकारी सुवर्णा पाटील, संस्थेचे अध्यक्ष सागर घोरपडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका उषादेवी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशांत गवळी, अजय शिंदे, समीर मुल्लाणी, उदय ओतारी, युवराज शिंदे सोनाली घोरपडे तसेच रायकर सर, कानकेकर मँडम यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी स्री शिक्षणाचे महत्व, तसेच आजच्या जगात स्त्रियांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले.
Leave a Reply