
कोल्हापूर: महिला समाजामध्ये आई, पत्नी, सून, मुलगी आणि मैत्रिणी म्हणून सगळ्यांनाच वेळ देत असतात. हा महिलांचा स्वभाव गुणधर्म आहे मात्र या जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिला म्हणून योग्य असून पहिल्यांदा स्वतःला वेळ देऊन स्वतःची काळजी घ्यावी असं प्रतिपादन संयोगीताराजे छत्रपती यांनी केलं. त्या प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डी वाय पाटील ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या प्रबोधन रॅलीच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होत्या. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डी वाय पाटील ग्रुप यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचे उद्घाटन संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि हवेत फुगे सोडून झाले. आमदार सतेज पाटील महापौर सरिता मोरे सोशल वेल्फेअर चे अध्यक्ष प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं या उदघटनाप्रसंगी बोलताना संयोगीताराजे छत्रपती यांनी आज जागतिक महिला दिनाच्या हा एक दिवस आपला विशेष नाही तर महिलांसाठी रोजचा दिवस हा विशेष असतो. सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रबोधनासाठी रॅलीचे आयोजन करून यासाठी महिलांच्या आरोग्याची संकल्पना घेतलीय ही खूपच कौतुकाची बाब आहे. आपण समाजात नेहमीच महिला म्हणून दुसऱ्यांना प्राधान्य देत असतो हा आपला स्वभाव गुणधर्म आहे. आपल्याला सगळ्यात शेवटी ठेवतो मात्र आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण आपण समाजामध्ये आई पत्नी सून मुलगी आणि मैत्रिणी अशा विविध भूमिका पार पाडत असतो आणि सगळ्यांनाच एक महिला म्हणून वेळ देतो. पण स्वतःसाठी शेवटचा एक मिनिटं देतो तो ही एक मिनिट कधीच येत नाही आणि ज्यावेळी तो क्षण येतो त्यावेळी आपली सर्व ऊर्जा संपलेली असते त्यामुळे महिलांनी सर्व गोष्टी सक्षमपणे केल्या पाहिजेत. असं एक मत व्यक्त करून या महिला दिनाच्या शुभेच्छा उपस्थित महिलांना दिल्या. यावेळी सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी वीर जवान तुझे सलाम म्हणून ज्या वीर जवानांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना अभिवादन करून या प्रबोधनात्मक रॅलीला सुरवात करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक क्षेत्रात महिलांचा उत्साह वाढवा यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असतात. अनेक महिला आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. याबाबत जागृती व्हावी यासाठी आपण महिला जागृती महिलांच्या आरोग्यासाठी ही संकल्पना घेऊन या रॅलीचे आयोजन केले आहे. महिला सक्षम
झाली तर समाज सक्षम होईल. त्यामुळे महिलांनी आता स्वतःची प्रगती केली पाहिजे. आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवतो त्याचाही लाभ महिलांनी घ्यावा. महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम असेल तर संपूर्ण समाज सक्षम होतो. त्यासाठी सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून एक परिपूर्ण स्त्री घडवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो यासाठी आमदार सतेज पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन असते. महिलांना सर्व गोष्टीचे ज्ञान असले पाहिजे मुलाचं संगोपन करण्याबरोबरच आरोग्याची काळजी आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. एकदा स्त्री सर्व बाबतीत ज्ञानी झाली तर संपूर्ण समाज सक्षम व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या बरोबर येणारे खूप हात आहेत तुम्ही हाक मारा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही प्रतिमा सतेज पाटील यांनी दिली. तसेच महिला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर समाज सक्षम होईल यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आपण महिलांना देत असतो. त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच गृहिणी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यामुळे अनेक महिला बचत गट सक्षम झाले आहेत. आपण राबवत असलेल्या विविध उपक्रमांना महिलांनी साथ द्यावी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं अवाहन सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केले.यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. तसेच डॉ संगीता निंबाळकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर शोभा बोंद्रे , वंदना बुचडे, वैशाली मंडलिक, राजलक्ष्मी नरके, शिल्पा नरके, मंजिरी देसाई-मोरे, म नगरसेविका उमा बनछोडे, स्वाती येवलुजे, माधुरी लाड, निळोफर अजरेकर, शोभा कवाळे, अश्विनी रामाने वृषाली कदम, स्वरूपा यड्रावकर, अमरीन मुश्रीफ यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. ही प्रबोधनात्मक रॅली गांधी मैदान ते बिंदू चौक या मार्गावर काढण्यात आली. बिंदू चौकात समारोप झाला
Leave a Reply