
कोल्हापूर : ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कर्तुत्ववान अशा सर्वच स्त्रियांच्या कार्याचा या दिवशी गौरव होत असतो. आजच्या घडीला महिला पुरुषांच्या एक पाउल पुढे जावून कामगिरी करताना आपणांस पहावयास मिळते. महिलांना कोणत्याच क्षेत्रात कमी लेखू नये, महिला दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळतात, अशा आशयाचा एक अनोखा संदेश देण्याकरिता उद्या महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे चालणारे दैनंदिन काम शिवसेना महिला आघाडी आणि भगिनी मंचच्या वतीने करण्यात आले. आज स्त्रियांच्या पारंपारिक जीवनाला आधुनिकतेचा स्पर्श झाला असून, त्यामुळे स्त्रिया स्वकर्तृत्वावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समाजाला सक्षम करण्याचे काम करीत आहेत. कर्तुत्ववान महिलांची हीच गगनभरारी समाजाला नवी दिशा देणारी ठरत आहे, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले सर्वसामान्यांच्या कोणत्याही कामासाठी सदैव खुले असलेले शिवसेनेचे शनिवार पेठ येथील कार्यालय नेहमीच गजबजलेले असते. याठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करतात. पण, आज हीच समाजकार्याची भूमिका उचलली शिवसेनेच्या रणरागिणीनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना शहर कार्यालयाच्या कामाची सूत्रे शिवसेनेच्या महिला आघाडीने हाती घेतली.
Leave a Reply