
कोल्हापूर : कोल्हापूर शहर एकत्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबीने १०६५.१९ कोटी रुपयांची मागणी केली होती.पण मुख्यमंत्री यांनी आय.आय.टी मुंबईचे स्थापत्य प्रमुख कृष्णराव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.त्यानुसार समितीने अहवाल दिला.त्यात आयआरबीला २७६.६३ मुल्यांकन किमत त्यात १२% व्याज आणि एमएसआरडीसीला अदा केलेली रक्कम देखभाल आणि दुरुस्ती अशी मिळून ५६८.३१७ कोटी इतकी होते.पण यासाठी टोल विरोधी कृती समितीचा आक्षेप होता म्हणून संतोष कुमार या समितीनुसार १८२.८७६ कोटी यात व्याज आणि देखभाल दुरुस्ती खर्च धरून ४१४.०१४ कोटी इतकी रक्कम निश्चित करण्यात आली. तसेच या दोन्ही समित्यांचा तौलानिक अभ्यास करून एस.बी.तामसेकर यांनी प्रत्यक्ष झालेल्या कामाचे मुल्यांकन १९७.३९९ कोटी इतके तर त्यात व्याज आणि देखभाल व दुरुस्ती पथकर वजा जाता ४५९.०४४ कोटी इतकी रक्कम देय करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आयआरबीला तामसेकर समितीनुसारच रक्कम देणार असे आज पत्रकार परिषदेत संगितल्रे. पत्रकार परिषदेस भाजप शहर अध्यक्ष महेश जाधव,बाबा देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply