
कोल्हापूर:प्रभाग क्र.६६, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी मधील साळोखे पार्क मध्ये गेली ३५ वर्षे प्रलंबित असलेला सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न सोडवण्यात खासदार धनंजय महाडिक यांना यश आले आहे. सुमारे २० लाख रूपये खर्च करून बांधण्यात येणार्या सांस्कृतिक हॉलचा भूमीपुजन सोहळा, खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, खासदार म्हणून केलेल्या विकासकामांची माहिती दिली. संसदेत विविध प्रश्न उपस्थित करणे, कायदे बनवणे ही खासदारांची कामे असतात. त्याशिवाय मतदार संघामध्ये रस्ते, पाणी, वीज, गटर्स अशा मुलभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं हे खासदारांचे कर्तव्य असते. आपण कर्तव्य तर बजावलेच, पण देशाच्या सर्वोच्च सभागृहात स्थानिक पातळीपासून देश पातळीपर्यंतचे अनेक महत्वाचे विषय उपस्थित केले. गल्ली पासून दिल्ली पर्यंत कामाचा ठसा उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. दरम्यान याच कार्यक्रमात महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या वैद्यकीय व्हॅनचा शुभारंभ, खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रभागाच्या नगरसेविका रूपाराणी निकम, सामाजिक कार्यकर्ते संग्राम निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, दादा जगताप, वसंतराव साळोखे, चौधरी मामा, सुदेश माने ,स्वप्नील जगताप ,राजू पोवार, नंदू पाटील, पात्रे आण्णा, चंदू मामा, सचिन चौगुले, आत्तार चाचा, पृथ्वीराज साळोखे,किरण पाटील, दिलीप पेटकर ,आप्पा शिंदे, संजय सोळंकी, अजित मगदूम, राजू तांबडे , प्रकाश कोळी, कुमार चौगुले, नारायण कणबरकर, राजू शेख यांच्यासह ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
Leave a Reply