
कोल्हापूर:शाहूवाडी-पन्हाळा परिसरासह दुर्गम ग्रामीण भागाच्या मूलभूत सोयीसुविधा उभारणीसह सर्वांगीण विकास आणि समाजात काबाडकष्ट करणाऱ्या बारा बलुतेदारांचे सर्वांगीण जीवनमान उंचावण्यासाठी आपण हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती संग्रामसिंह गायकवाड- सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ सर्वांगीन जीवनात कार्यरत असणारे छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक, ग्राम विकास सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असणारे संग्रामसिंह गायकवाड यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा खासदार पदाच्या निवडणुकीत होईल असा दावाही त्यांनी केला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात, युवावर्गाला वैद्यकीय शिक्षण घेता यावे म्हणून शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम जन्य निसर्गरम्य अशा आकुर्डे गावी मेडिकल कॉलेज सुरू करून याचा लाभ पंचक्रोशीत होत आहे. सर्वसमावेशक विकास, रचनात्मक कार्याची दूरदृष्टी तसेच कायदा आणि व्यवस्थापनातील उच्च शिक्षण यामुळेच खासदार पदाला आपण योग्य न्याय देऊ शकतो. यासाठी अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी जनतेसमोर येत आहोत. त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते होते. पण आता ते साखरसम्राटांच्या खिशात जाऊन बसले आहेत अशी टीकाही संग्रामसिंह गायकवाड यांनी केली.
हातकणंगले लोकसभा निवडणूक रिंगणात संग्रामसिंह गायकवाड
Hee chaal kunachi?
Yes