
कोल्हापुर : रुग्णालयांमध्ये स्वच्छते विषयक खराब परिस्थिती किंवा कमी दर्जाची वैद्यकीय उत्पादने वापरल्यास रुग्णाच्या सुरक्षितते विषयी समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे रूग्णांस संक्रमण होऊ शकते.डॉ.बसवराज व्ही. कडलगे, सल्लागार, ओन्को सर्जरी, एस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापुर म्हणाले की रुग्णालयात दाखल रुग्णामध्ये हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन (एचएआई) च्या माध्यमातलुन बॅक्टेरियल किंवा फंगल विकसित होने सामान्य गोष्ट आहे आणि योग्य वेळी याचे निदान व इलाज झाला नाही तर हे संक्रमण (बीएसआई), निमोनिया, मूत्र मार्गाचे संक्रमण (यूटीआई), आणि सर्जिकल साइट संक्रमण (एसएसआई) सारख्या गंभीर रोगांचे रूप घेऊ शकते. इनवेसिव प्रक्रिया आणि शस्त्रक्रियेच्या माध्यमातुन जाणार्या रुग्णांमध्ये अश्या संक्रमणाचा धोका अधिक असतो. औषधे, रक्त किंवा ग्लूकोज आणि कॅथेटरशी संबंधित संक्रमण नियंत्रित करण्यासाठी आयव्हीचा वापर सामान्य आहे. काही उत्कृष्ट वैद्यकीय संस्थांनी आणि रुग्णालयांनी औषधांद्वारे होणारे संसर्ग टाळण्यासाठी नवीन अत्याधुनिक उपाययोजना वापरण्यास सुरवात केली आहे.ही नवीनतम आई.व्ही कंटेनर फार प्रगत आहेत, जे रुग्णांच्या सुरक्षेसाठी उच्च मानक असलेल्या सुविधा प्रदान करतात. औषधांच्या प्रवेशापासून ते वितरणापर्यंत सर्व आई.व्ही प्रक्रिया सुविधाजनक असतात.आयव्ही.लिक्विड कंटेनर बंद हवा प्रणाली कंटेनर असावा जेणेकरून बाहेरील हवेचा हस्तक्षेप आणि संक्रमणाचा धोका होणार नाही. आई.व्ही द्रव पदार्थ कंटेनर बंद सिस्टम कंटेनर असावा ज्यात बाहेरील हवेचा हस्तक्षेप आणि संक्रमणाचा धोका नसतो. असे डॉ.कडलगे म्हणाले.
Leave a Reply