
कोल्हापूर: आपण निवडून दिलेले खासदार दिल्ली दरबारी स्वतःची ओळख निर्माण करत आहेत, संसदेमध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न मांडत आहेत, कोल्हापूरसह राज्य आणि देशाच्या विकासाच्या धोरणात्मक चर्चेमध्ये भाग घेत आहेत, हे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरकर म्हणून आम्हाला खासदार धनंजय महाडिक यांचा अभिमान वाटतो. येत्या लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिध्द केलेल्या धनंजय महाडिक यांनाच निवडून देऊ, असा स्पष्ट निर्धार रविवार पेठ परिसरातील मान्यवर व्यक्ती आणि तालीम संस्थांनी व्यक्त केला. ही निवडणूक सक्रीय विरुध्द निष्क्रीय अशी होत असून, ज्यांचा समाजाशी आणि सामाजिक कार्याशी कसलाही संबंध नाही त्यांना जमिनीवर आणू, असा टोला जहॉंगीर जमादार यांनी संजय मंडलिक यांना लगावला. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आज रविवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली. खासदार महाडिक यांचं जोरदार स्वागत करुन स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला.
रविवार पेठ परिसरात आज खासदार धनंजय महाडिक यांनी पदयात्रा काढून, स्थानिक नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करुन, खासदार महाडिक यांचा गौरव केला. सकाळपासूनच रविवार पेठ परिसरातील मान्यवर नागरिक खासदार महाडिक यांच्या स्वागतासाठी थांबले होते. संयुक्त रविवार पेठ तालीम मंडळ, सोनटक्के तालीम मंडळ, भुई गल्ली तालीम मंडळ, हनुमान तालीम मंडळ आणि अन्य सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासदार महाडिक यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले होते. या सर्वच तालीम संस्थांनी खासदार महाडिक यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. डॉ. मोहन पवार यांनी खासदार महाडिक यांचे स्वागत करुन, गेल्या ५ वर्षातील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आपण निवडून दिलेले खासदार संसदेत आत्मविश्वासाने आणि अभ्यासाने बोलत आहेत, जनहिताचे मुद्दे उपस्थित करत आहेत, हे कोल्हापूरकरांनी पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे आपण योग्य माणसाला निवडून दिले, ही कोल्हापूरकरांची खात्री पटली. येत्या निवडणुकीतही स्वतःला सिध्द केलेल्या धनंजय महाडिक यांना िनवडून देऊ, असा विश्वास डॉ. प्रमोद बुलबुले यांनी व्यक्त केला. जहॉंगीर जमादार म्हणाले, ही निवडणूक सक्रीय विरुध्द निष्क्रीय अशी आहे. त्यांनी गेल्या ५ वर्षात आठ हजार कोटींचा निधी आणला, तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला. त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यामुळे विकासाची दृष्टी असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांचा येत्या लोकसभा निवडणुकीत विजय निश्चित आहे. या पदयात्रेदरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधला. रविवार पेठेतील प्रत्येक घरातून खासदार महाडिक यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. बिंदू चौक, बागवान गल्ली, महात गल्ली, भोई गल्ली, चांदणी चौक या परिसरात खासदार महाडिक यांनी पदयात्रा काढून नागरिकांचे आशिर्वाद घेतले. यावेळी जयेश कदम, निशांत वाकडे, माजी नगरसेवक राजू यादव, अशोक गोलंदाज, समीर नलवडे, मधुकर तोरस्कर, सुनील कदम, बाळासाहेब मुधोळकर, सचिन तोडकर, श्री. टोपकर, शामराव शिंदे, रवी पाटील, अमित सावंत, सुनील शिंदे, श्री. सय्यद यांच्यासह तालीम संस्था तसेच सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply