
कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या निवडणूूक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोमवारी दुपारी १.३० वाजता होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लक्ष्मीपुरी येथे या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी दुपारी १.३० वाजता होणार आहे. कोंडाओळ, लक्ष्मीपुरी येथे या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार असून, याप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply