
खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे, कोल्हापूर लोकसभा मतदार संघासह राज्यातील अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. महिला सुरक्षा, विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन, कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडणे, विमानतळ विस्तारीकरण, अशा अनेक बाबींतून खासदार महाडिक यांनी आपली छाप पाडली आहे. निधी खेचून आणायची धमक आणि विकासकामे पूर्ण करण्याचा आवाका असलेल्या खासदार महाडिक यांना पुन्हा लोकसभेत पाठवणे ही सर्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सौ. अरूंधती महाडिक यांनी आजरा संपर्क दौर्यावेळी केली. महागोंड, वजरे या ठिकाणी झालेल्या महिला मेळाव्यांना उदंड प्रतिसाद मिळाला.
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी महिला वर्गाने पुढाकार घेतला आहे. महागोंड आणि वजरे या ठिकाणी झालेल्या महिला मेळाव्यात सौ. अरूंधती महाडिक म्हणाल्या, महिला वर्गाच्या सबलीकरणासाठी खासदार महाडिक यांनी सातत्याने उपक्रम राबवले आहेत. त्यातून हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले. महिलांच्या आरोग्याचा, सुरक्षेचा मुद्दा खासदार महाडिक यांनी महत्वाचा मानला. त्यासाठी काम केले. त्यामुळेच नारी शक्तीचा खासदार महाडिक यांना एकमुखी पाठींबा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण आणि दांडगा जनसंपर्क, या बाबींमुळे खासदार महाडिक यांना समाजातील सर्व घटकांचे पाठबळ आहे. खासदार महाडिक यांचा विजय निश्चित असून, आपण सर्वांनी मिळून विक्रमी मताधिक्य देवूया, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची लोकसभेत अभ्यासपूर्ण मांडणी करत, ते सोडवण्यासाठी नियोजन करून, टॉप वन खासदार बनण्याचा बहुमान महाडिक यांनी पटकावला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि राष्ट्रवादी पक्षाच्या गौरवात भर पडली आहे. अशा अभ्यासू आणि व्यापक दृष्टी असलेल्या व्यक्तीला लोकसभेत पाठवणे अत्यावश्यक आहे. खासदार महाडिक यांच्या प्रयत्नामुळेच लोकलमध्ये सीसी टिव्ही बसवणे, सॅनिटरी नॅपकीनबाबत धोरण निश्चिती करण्यास केंद्र सरकारला भाग पडले. दिल्ली मध्ये कोल्हापूरचे नाव उज्वल करणार्या खासदार महाडिक यांच्याबद्दल सर्वपक्षीय खासदारांमध्ये आत्मियता आहे. सर्वसामान्यांमध्येही खासदार महाडिक यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मात्र काही अपप्रवृत्तींनी दिशाभूल करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र कोल्हापूरची जनता अशा प्रवृत्तींना या निवडणूकीच्या माध्यमातून कायमची अद्दल घडवेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला ग्रामपंचायत सदस्या सुजाता पाटील, गीता देसाई, लिला पाटील, ज्योती कांबळे, मंगल कापसे, अनुसया रोडे, वैशाली कोंडुस्कर मिलींद बर्गे, बाळासाहेब पाटील, संजय जाधव, मारूती देसाई, वसंत घुरे, संजय पाटील, संभाजी पाटील, दादुराव पाटकर, प्रकाश रोडे, अशोक पाटील, जयराम घमे, समीर चॉंद, महेश माळगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply