
कोल्हापूर : रत्नागिरी जिल्हयात मौखिक आरोग्य प्रबोधन आणि दतं उपचार क्षेत्रात कार्यरत विंग्स् पब्लीक चॅरिटेबल ट्रस्टने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्षेत्र विस्तार केला आहे.त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुहास भगत आणि उपाध्यक्षा डॉ.सई भगत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर कॉर्नर समोरील पादचारी पुल परिसरात अद्यायवत यंत्रणेसह कोल्हापूरातील युनिट सुरू झाले आहे . येथे डेटीस्ट दिपाली केंद्रे या तपासणीसह मार्गदर्शन आणि उपचार करणार आहेत. येथे सामाजिक बांधिलकीतून रुट कॅनेल उपचार मोफत केले जाणार आहेत,तर दांतामध्ये सिंमेट – चांदी भरणे, क्लिनिंग, कवळी बसविणे ( इंनप्लान्ट ) , कॅप बसवणे,वेडेवाकडे दात सरळ करणे आदि उपचार ही माफक दरात केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या दंत उपचार क्षेत्रातील तज्ञ डॉ.पल्लवी मोरे,डॉ.मोहसीन रेझा, डॉ.प्रभु राजसिंग गरजेनुसार व्हिजीटींग डॉक्टर म्हणून उपलब्ध असणार आहेत . विंग्स्ने सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरीत गत साडेपाच वर्षात आठरा हजाराहून अधिकांवर उपचार केले आहेत. तर अनेक महाआरोग्य शिबीरामधून मौखिक उपचारासाठी प्रबोधन ही केले आहे. कोल्हापूर पंचक्रोशीतही यांचा लाभ घेण्यासाठी व्याख्याने, दंत आरोग्य शिबीरासाठी महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, प्रशाला,ज्येष्ठ नागरिक संघ यांनी या 7776911222 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आहवान विंग्स् पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट ने केले आहे .
Leave a Reply