
कोल्हापूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी हा दिवस व्यसन मुक्ती संकल्प दिन म्हणून साजरा करणार आहोत त्याच अनुषंगाने हेरले येथील ह्रदया हॉस्पिटलच्या वतीने व्यसन मुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही मोटार सायकल रॅली काढण्यात येईल अशी माहिती हॉस्पिटलच्या डॉ.सुरेखा चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बदलती जीवन शैली,मनोरंजन साधनांचा वाढता प्रभाव सोशल नेटवर्क यामधून प्रसारित होणारी चुकीची माहिती यामुळे आजची पिढी व्यासना च्या छायेत अडकत आहे.सिगारेट,ड्रग्ज,मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे.१६ ते ३० वर्षे वयोगटात हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.अशा वेळी तरुणांमध्ये बंडखोरीची मानसिकता असते.ज्येष्ठ लोकांचे म्हणणे त्यांना ऐकायचे नसते.त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन योग्यवेळी मार्गदर्शन केले तर आजची पिढी नक्कीच व्यसनापासून लांब राहू शकेल.या व्यसनांमुळे कॅन्सर,हृदयरोग,किडनीचे आजार,पोटाचे विकार असे भयानक आजार उद्भवतात. यासाठीच पुढील संभाव्य धोके लक्ष्यात घेऊनच या रॅलीचे आयोजन केले आहे असेही डॉ.संतोष चौगुले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस डॉ.श्रीनाथ कुलकर्णी,डॉ.अविनाश कुलकर्णी,मनीषा कदम,जयदीप जाधव,डॉ.प्रदीप पोवार,शैलेश टांकसाळकर उपस्थित होते.
Leave a Reply