
कोल्हापूर : अॅस्टर आधार हॉस्पिटलच्यावतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यास २० लोखंडी बॅरीकेडस प्रदान करण्यात आली.शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत सतत होणाऱ्या ट्रॅफिक जॅम,मोर्चे, महत्वाचे बंदोबस्त व नाकाबंदी,जन आंदोलने यासाठी पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बॅरीकेडस सारख्या साधनांची आवश्यकता भासत असते.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत एक लाख २५ हजार रुपये किमतीची जन जागृतीचा संदेश लिहिलेले बॅरीकेडस आज प्रदान करण्यात आले.अॅस्टर आधार हॉस्पिटल हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जाणून काम करत आहे.आणि यापुढेही हॉस्पिटलच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार असल्याचे हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर डॉ.आर.आर.देशपांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमास मॅनेजर आयेशा राऊत,शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले,जाधव,उपनिरीक्षक बडे, सहाय्यक फौजदार गेंगजे यांच्यासह पोलीस,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply